शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश; PAT परीक्षा आता डिसेंबरमध्ये
नगर : दर्शक । राज्यातील शाळांमध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी (PAT) क्रमांक १ आता डिसेंबर महिन्यात होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. मात्र, दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर लगेचच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची उजळणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, तसेच सुट्टीनंतर काही विद्यार्थी शाळेत उशिरा हजर झाल्यास ते परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती.
या सर्व बाबींचा विचार करून शिक्षक भारती संघटनेने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. शिक्षक भारती संघटनेच्या या मागणीला यश आले असून, आता ही परीक्षा २, ३ आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यासंदर्भात शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होणे आवश्यक आहे. दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर लगेच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुरेशी तयारी करता येणार नाही. तसेच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सुट्टीनंतर काही दिवस उशिराने शाळेत दाखल होण्याची शक्यता असते.
त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये आणि सर्व विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, या भूमिकेतून शिक्षक भारतीने ही मागणी केली होती. शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांच्या या रास्त मागणीची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शिक्षक भारती संघटना यापुढेही सातत्याने पाठपुरावा करेल. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब जगताप.विजय लंके .आनंद झरेकर .आशादेवी गाडगे/लंके यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानले.
या पाठपुराव्यासाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा सचिव विजय कराळे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार, कैलास जाधव कार्यवाह संजय भुसारी योगेश हराळे, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संतोष शेंदुरकर,
संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर तसेच विनाअनुदानित राज्याध्यक्ष रूपाली कुरूमकर यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षक भारतीच्या संघटित पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा निर्णय होण्यास मदत झाली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com