Ahmednagar Traffic Signal : जिल्हाधिकार्यांकडे निवेदनद्वारे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) - यश पॅलेस चौक ते डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पुलाखालील खांब व अपुर्या पोलिस यंत्रणेमुळे वाहतुक व्यवस्था सुरळीत होत नसून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणीचे सिग्नल (Ahmednagar Traffic Signal ) कार्यान्वित करावेत, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,कायनेटिक चौक, यश पॅलेस चौक, स्वास्तिक चौक, चांदणी चौक, माळीवाडा बस स्टॅण्ड, कोठी चौक, चाणक्य चौक, चांदणी चौक, स्टेट बँक चौक, कोठला स्टॅण्ड या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्ति केली नसल्याने अनेक अपघात होत आहे.
यापूर्वी अनेकवेळा संबंधितांना पत्रव्यवहार करत सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे. पोलिस अधिक्षक कार्यालय शहर वाहतुक शाखा यांच्याकडून जा.क्र.367/2022 दि.20/5/2022 रोजी आम्हाला मिळालेल्या पत्रामध्ये आपण स्पष्ट नमुद केले आहे. की उड्डाणपुलाचे काम पुर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आपण नमुद केलेल्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरु करणे योग्य राहील.
तरी उड्डाण पुल आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आपल्या पातळीवरुन शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून वरील ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. या संदर्भात आपणास दिनांक 19/12/2022 रोजी देखील पत्र व्यवहार करुन स्मरण करुन देण्यात आले आहे. पुढील काळात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने जन आंदोलन हाती घेतले जाईल व त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन यंत्रणेची असेल.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com