अहमदनगर (प्रतिनिधी) - केडगाव येथील सद्गुरू शंकर महाराज मठाच्यावतीने सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान, श्री क्षेत्र नारायण बेट (ता.दौंड) येथे दिव्य यज्ञ सोहळ्याचे शुक्रवार दि.26 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. यात 1 हजार 111 सहस्त्रकुंडी महादत्तयाग होत आहे. श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज यांच्या 138 व्या जन्मोत्सवानिमित्त हा सोहळा आयोजित केला आहे. महादत्तयाग सोहळ्याचा विक्रम होणार असून, त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
केडगावमधील शिवाजीनगर येथील शंकर महाराज मठाचे गुरुवर्य अशोकदादा जाधव यांच्या पुढाकारातून हा महादत्तयाग सोहळा होणार आहे. यात श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, ठाणे व सोलापूर येथील सद्गुरु योगीराणा ज्ञानसागर श्री शंकर महाराज ध्यानमंदिर यांचे सहकार्य मिळणार आहे. विशेष म्हणजे नारायण वेट येथे तब्बल 90 वर्षांनी दत्तयाग सोहळा होत आहे. श्री क्षेत्र नारायण बेट येथे 90 वर्षांनंतर प्रथमच सत्यनारायण महापूजा व महादत्तयाग सोहळा होत आहे.
शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत सहस्त्रकुंडी (1111) महायज्ञ दत्तयाग होईल. त्यानंतर पूर्णाहुती, महाआरती व पालखी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या यज्ञासाठी एक व्यक्ती अथवा दाम्पत्य बसू शकते. नोंदणीसाठी केडगाव येथील शंकर महाराज मठाच्या सेवकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.8432081313 या नंबरवर संपर्क साधावा.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com