Ahmednagar News : वसंत व्याख्यानमाला पुष्प दुसरे
अहमदनगर (प्रतिनिधी) Ahmednagar News : वाचनाने माणूस समृद्ध होतो. माझ्या जडण-घडणीत विविध साहित्यिकांच्या लिखाणाचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन प्रा.अविनाश कोल्हे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने लोकमान्य टिळक सभागृहात प्रा.कोल्हे यांनी ‘मला भेटलेले साहित्यिक, कलावंत’ या विषयावर वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, संचालिका शिल्पा रसाळ, ज्योती कुलकर्णी, निमंत्रित सदस्य चंद्रकांत पालवे उपस्थित होते.
प्रा.कोल्हे यांनी नावाजलेल्या विविध साहित्यिकांचे किस्से सांगत रंगत आणली. लोकमान्य टिळक, आगरकर हे उत्तम साहित्यिक होते, असे सांगत त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीलाही उजाळा दिला. गोपाळ नीळकंठ दांडेकर यांच्या धगधगत्या आयुष्याचा त्यांनी वेध घेतला. कुसुमाग्रज, भालबा केळकर, रघुनाथ साळवे, चि.त्र्यं.खानोलकर, ज्ञानकोशकार केतकर, श्री.ग.माजगांवकर, पु.ल.देशपांडे, यदुनाथ थत्ते, प्र.के.अत्रे, रॉय किणीकर, व्यंकटेश माडगुळकर याचबरोबर शेक्सपिअर यांच्या साहित्यिक ऐवजाचाही प्रा.कोल्हे यांनी वेध घेतला. विविध साहित्यिकांच्या साहित्याची सैर त्यांनी घडविली.
प्रा.मोडक यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी करुन दिला. दिलीप पांढरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी केले. यावेळी ग्रंथपाल अमोल इथापे, साहित्यिक सदानंद भणगे, कुंदाताई हळबे, प्रा.रामचंद्र कुलकर्णी, भूषण देशमुख उपस्थित होते.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी उपग्रंथपाल नितीन भारताल, संकेत फाटक, कुमार गेंट्याल, संजय गाडेकर, पल्लवी, कुक्कडवाल यांनी परिश्रम घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com