मोबाईल आणि संगणकाच्या अतिवापरामुळे वाढलेले नेत्ररोग चिंताजनक : तन्वीर चष्मावाला
नि:शुल्क शिबिरात 117 नेत्र तपासणी व 17 मोतीबिंदू शस्त्रक्रिया
नगर - आजच्या वेगवान आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे डोळ्यांचे आजार वाढत चालले आहेत. दीर्घकाळ मोबाईल, संगणक, टीव्ही यांचा वापर, अपुरी झोप आणि अयोग्य आहार यामुळे दृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. महागाईच्या या काळात अनेकांना नेत्र तपासणी व उपचार परवडत नाहीत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्या साठी नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिरांची गरज अधिक भासते. अशा उपक्रमांमुळे अनेकांना पुन्हा प्रकाश दिसण्याची संधी मिळते, हीच खरी सामाजिक सेवा आहे.असे प्रतिपादन अलनुर आय केअर सेंटरचे तन्वीर चष्मावाला यांनी केले.
राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन, एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय पुणे, अलनूर आय केअर सेंटर व मखदूम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे मुकुंदनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एच. व्ही.देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ. आनंद बोज्जा, समता फाउंडेशनचे अभिषेक शिंदे, अलनूर आय केअर सेंटरचे तनवीर चष्मावाला, शेख नूर साहब, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, शाहनवाज तांबोली, शफकत सय्यद, रुमान शेख, रेहान शेख, हारून शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये एकूण 117 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. त्यापैकी 20 रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुण्याला पाठविण्याचे ठरविण्यात आले.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून समता फाउंडेशन आणि अलनूर आय केअर सेंटर यांचे विशेष योगदान राहिले. शिबिर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवकांचे उपस्थितांनी कौतुक केले.
मखदूम सोसायटीच्या माध्यमातून पुढील काळातही अशा सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी दिले.सुत्रसंचालन शाहनवाज तांबोली यांनी केले.आभार शफकत सय्यद यांनी मानले.
👁️ डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी काही सोप्या टिप्स
🔹 20-20-20 नियम पाळा — प्रत्येक 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवा आणि 20 फूट अंतरावरील वस्तूकडे 20 सेकंद बघा.
🔹 झोप पूर्ण घ्या 😴 — 7-8 तासांची झोप डोळ्यांना विश्रांती देते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करते.
🔹 स्क्रीन ब्राइटनेस नियंत्रित ठेवा 💻📱 — जास्त उजेडात किंवा अंधारात मोबाईल/लॅपटॉप वापरू नका.
🔹 डोळ्यांना नियमित थंड पाण्याने धुवा 💧 — डोळ्यांचा थकवा आणि कोरडेपणा कमी होतो.
🔹 संतुलित आहार घ्या 🥕🥦 — गाजर, पालक, अंडी, बदाम यांसारखे व्हिटॅमिन A आणि ओमेगा-3 युक्त पदार्थ खा.
🔹 सूर्यप्रकाशात सनग्लास वापरा 😎 — अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करा.
🔹 डोळे चोळू नका 🚫 — त्यामुळे संक्रमण होऊ शकते किंवा कॉर्निया दुखावू शकतो.
🧘♀️ घरच्या घरी करता येणारे डोळ्यांचे सोपे व्यायाम
👁️ 1. पामिंग (Palming):
हात चोळून उष्णता निर्माण करा आणि डोळ्यांवर काही सेकंद ठेवा. याने डोळ्यांचा थकवा कमी होतो.
👀 2. आय रोल (Eye Roll):
डोळ्यांना गोल गोल फिरवा – वर, खाली, डावीकडे, उजवीकडे – दिवसातून 2-3 वेळा.
🔄 3. ब्लिंकिंग (Blinking):
दर काही सेकंदांनी डोळे मिचकवा; त्यामुळे डोळ्यांची नैसर्गिक आर्द्रता टिकते.
🎯 4. फोकस शिफ्ट (Focus Change):
बोट डोळ्यांसमोर ठेवा आणि दूरच्या वस्तूकडे पाहा, मग पुन्हा बोटाकडे. हे व्यायाम दृष्टी स्थिर ठेवतात.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com