डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट संघ मालकांचा चांगला प्रतिसाद
१ जून पासून १० जून पर्यंत वाडियापार्क मैदानावर सामने
अहमदनगर (प्रतिनिधी) : डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट दि १ ते १० जून पर्यंत वाडियापार्क मैदानावर सामने होत असून काल यश ग्रँड हॉटेलवर झालेल्या खेळाडू लिलावास चांगला प्रतिसाद संघ मालकांनी दिला , स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे ,यावेळी ११ संघांचे मालक उपस्तित होते तर व्यासपीठावर रणजी खेळाडू अझीम काझी संयोजक समितीचे शाहिद खान, मुद्दसर तांबटकर ,शाहनवाज पठाण, इम्रान शेख,फिरोज शेख, मोहसीन काझी उपस्थित होते
यावेळी १७६ खेळाडूंचा लिलाव झाला संघमालकानी यामध्ये बोली बोलून आपले खेळाडू निवडले यामध्ये संघमालक युनायटेड सिटी हॉस्पिटलचे डॉ इम्रान ,एडीएस ११ चे अंकित दुग्गल, अल्पना शूजचे मुस्तकिन भाई व रमीज भाई ,संकल्प ११ चे चांगदेव घोडके ,विपुल शेटीया ११ चे विपुल शेटीया ,वीर भगतसिंग चे सतपाल सर,ए पी इनक्राफ चे अजयशेठ पोखरणा ,साई एजन्सीचे प्रकाश राठोड,बॉंबे किचन चे यासार तांबटकर, अली वॅरियर्स चे शैबाज हाजी पायोनियर संघाचे गोपाळ ज्ञानपेल्ली उपस्थित होते
आयकॉन खेळाडूचा लिलाव ५००० रु पासून पुढे बोली लावण्यात आली यामध्ये सर्वात जास्त बोली रु ५० हजार मुद्दसर तांबटकर वर लागली सर्व संघ मालकांनी चांगला प्रतिसाद दिला १ जून पासून रोज ६ सामने होणार आहेत , नागरकर क्रिकेट प्रेमी साठी हि पर्वणी ठरणार आहे यामध्ये अनेक रणजी खेळाडू येणार आहेत तर प्रथम पारितोषिक रु ५१ हजार व टीम मालकाला मोटार सायकल व दुसरे बक्षीस रु ३१ हजार व टीम मालकाला स्मार्ट टीव्ही तसेच खेळाडूंना इतर अनेक बक्षिसे आहेत

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com