HSC Result : इ.12वी शास्त्र शाखेचा 100 टक्के तर कला शाखेचा 92 टक्के निकाल
अहमदनगर (प्रतिनिधी) - वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.ना.ज.पाउलबुधे उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वी शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल लागला तर कला शाखेचा 91.48 टक्के लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी एच.एस.सी (इ.12 वी.) परिक्षेत सुयश संपादन केले. शास्त्र शाखेतील 67 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. कु.साक्षी नागरगोजे हिने 600 पैकी 502 गुण (83.17) मिळवत प्रथम आली. तर सार्थक ठिपसे (86.17%) गुण मिळवत द्वितीय व दुर्वेश चोथे (67.67%) गुण मिळवत तृतीय आला.
कला शाखेतील प्रविष्ठ 47 विद्यार्थ्यांपैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कला शाखेचा 91.48 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये अनुक्रमे प्रथम - ऋतुजा सुरम (70%), द्वितीय - सुनाक्षी शिंदे (68%), तृतीय - दुर्वेश चोथे (67%) गुण मिळवत यश संपादन केले.
सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य भरत बिडवे, सर्व शिक्षक, शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, पदाधिकारी, विश्वस्त, शालेय समिती सदस्य आदिंनी अभिनंदन केले.
-compressed.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com