Ahmednagar Shivsena: जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करावा-काका शेळके
जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन
Ahmednagar Shivsena: अहमदनगर (प्रतिनिधी) - सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली आहे. नगर जिल्ह्यातील तापमानातही वाढ होत असून, 40 अंशाच्यापुढे पारा गेला आहे. उन्हामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तातडीने उष्माघात कक्षाची स्थापना करावी, असे निवेदन शिवसेना सावेडी विभागप्रमुख काका शेळके यांनी जिल्हा शल्य चिकित्सांकाना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हणाले आहे की, जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य, गोर-गरीब, कष्टकरी रुग्ण येत असता. सध्याच्या उन्हाची तीव्रता पाहता या ठिकाणी उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात यावी,
जेणेकरुन रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे उष्माघाताबाबत जनजागृती करण्यात यावी. याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com