अहमदनगर - अहमदनगर रेल्वे स्थानकाच्या सल्लागारपदी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे सचिव व शहर सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अशोकराव कानडे यांची फेर निवड करण्यात आली. सोलापूर विभागीय सहाय्यक वाणिज्य प्रबंधक कल्पना बनसोडे यांनीही नियुक्ती केल्याचे पत्र दिले.
     श्री.कानडे हे गेली 10 वर्षापासून सल्लागार म्हणून काम करत आहेत. नगर-पुणे शटल रेल्वे सुरु करण्याबाबत गेली दोन वर्षांपासून सेंट्रल रेल्वे प्रशासन, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खा.दिलीप गांधी यांच्या सहकार्याने प्रयत्न केले.
     लवकरच नगर-पुणे फास्ट शटल रेल्वे सुरु होईल. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्यांना नगर रेल्वे स्थानक येथे थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरचे मुख्य वाणिज्य निरिक्षक आर.एस.मीना, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हरजीतसिंग वधवा, संदेश रपारिया, श्री.दुर्गे, श्री. तोमर यांचे नेहमी सहकार्य लाभते, असे निवडीनंतर श्री.कानडे यांनी सांगितले.
     श्री.अशोक कानडे यांची रेल्वे सल्लागार समितीवर अशोकराव कानडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com