Misgar Jamat Nagar | रेहान काझी व त्यांचे प्रवक्ते यांनी समाजाची दिशाभूल करू नये - युनुस तांबटकर
नगर - नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट F-17 संदर्भात रेहान काझी व इतर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल करणारे वक्तव्य करून समाजाची फसवणूक करत आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की आम्ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार आज तागायत कामकाज करत आहोत. आमचे सर्व व्यवहार चेक ने केले जातात,कारण संस्थेचे आर्थिक व्यवहार रोखीने होत नाही.या कारणास्तव कोणीही रोखीचा व्यवहार करू नये.
 2265/2017 हा चौकशी अर्ज होता यामध्ये यांनी असे आदेश दिले होते की परिशिष्ट एक वर असणाऱ्या विश्वस्तांनी नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी. परिशिष्ट एक नुसार रशीद दाऊद खान हे एकच विश्वस्त हयात आहेत. पाच विश्वस्तांची संस्थेच्या सभासदांची सभा घेऊन नेमणूक केली त्यानुसार 1457 2021 त्यांच्या सहीने व शपथेवर दाखल करण्यात आले होते. त्यावर सुनावणी होऊन निर्णय देण्यात आलेला आहे. सदर निर्णयामध्ये युनूस सुलतान तांबटकर यांनी कामकाज करू नये अशे कोणतेही आदेश धर्मदाय आयुक्त यांनी दिलेले नाही.
असे असताना रेहान काझी यांना कायदेशीर कोणताही अधिकार नव्हता व नाही यांनी बेकायदेशीर रित्या संस्थेच्या जागेतील वर्गाचे व शाळेच्या ऑफिसचे कुल्प तोडून स्वतः विश्वस्त आहेत असे भासवण्याचे प्रयत्न केलेले आहे. यामुळे या बोगस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे.
 तसेच रोख स्वरूपात पैसे जमा केल्याबद्दल धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी अर्ज क्रमांक 61/ 2023 नुसार चौकशीचे आदेश दिलेले आहे. संस्थेचे सर्व व्यवहार हे चेक ने केले जातात. कोणताही रोखीचा व्यवहार होत नाही. रेहान काझी यांनी परस्पर संस्थेच्या नावावर व कॉलेज आणि एम इंग्लिश चे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ही सत्य परिस्थिती असताना सभासदांची व भाडेकारींची  दिशाभूल करणारे बातम्या देऊन स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com