मौजे म्हसे येथील ग्रामसेवकाचा मनमानी कारभार
कुंभार समाज बांधवावर अन्याय होत असल्याने बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी) - मालमत्ता क्र.37/2 ला नमुना नं.8 उतारा सन 2014-15 आकारणी यादीमध्ये असतांना कोणत्याही आदेशाशिवाय अगर ठराव्याशिवाय तसेच विनंती अर्जाशिवाय मौजे म्हसे (ता.श्रीगोंदा) येथील गावातील ग्रामसेवकाने मनमानी कारभार करीत उतार्यावर जादा तीन नंबर टाकले. पुर्वीचे वर्णन बखळ असताना दगड, माती बांधकाम, लोखंडी पत्रा, सिमेंट पत्रा, स्लॅब इमारत अशी परस्पर नोंद टाकल्याने 60*40 फूट लांबीची जागा गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीसाठी गिळंकृत करण्यासाठी सहकार्य केले मात्र आमचे समाज बांधव हनुमंत बाबुराव कुंभार यांच्यावर अन्याय केला आहे.
आमच्या कुंभार समाज बांधवावर अन्याय होत असल्याने त्यांना न्याय मिळावा. खोटा पुरावा, खोटी कागदपत्रे तयार करुन ग्रामसेवकांने अधिकाराचा दुरुपयोग करीत हनुमंत कुंभार यांना त्रास दिला. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नायब तहसिलदार शंकर रोडे यांनी निवेदन स्विकारले. याप्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष अनिल इवळे, सचिव मच्छिंद्र बनकर, महिला जिल्हाध्यक्षा मनिषा गुरव, प्रमोद गुरव, लवेश गोंधळे, भाऊसाहेब कोल्हे, अभिषेक घटमाळ, नितीन घोडके, ज्ञानेश्वर देशमुख, भ.गं.पवार, बाळासाहेब इवळे, अनुरिता झगडे, रोहिणी बनकर आदि उपस्थित होते.
यावेळी हनुमंत कुंभार यांनी नायब तहसिलदार शंकर रोडे यांच्यासमोरआपली वस्तूस्थिती सांगितली. ते म्हणाले 1993 पासून मौजे म्हसे येथे मी कुंभार कामासाठी व भट्टीसाठी जागा वापरत आहे. वडिलोपार्जित घर आहे. तेथेच सरकारी जागेत 4 प्लॉट आहे. त्यातील 1 प्लॉट मी 93 पासून माती टाकून कुंभार व्यवसाय करतो. इतर सरकारी प्लॉटवर गावातील एका व्यक्तीने ग्रामपंचायतीला हाताशी धरुन बनावट खोटे कागदपत्रे तयार करुन सदर प्लॉट फुकट, लबाडीने गिळंकृत करण्याचे षडयंत्र करीत आहे. त्याला ग्रामसेवक सहकार्य करतो. याबाबत मी ग्रामसभेत ठराव केला. माहितीचा अधिकारात सत्यता उघडकिस आली; पण कोणीच दाद देत नाही. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी विनंती कुंभार यांनी केली.
या निवेदनावर श्री.रोडे यांनी पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र पाठविण्यासाठी गृह शाखेला सांगितले. हनुमंत कुंभार यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल असे संघाच्या पदाधिकार्यांना आश्वासन दिले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com