डॉ.विखे पाटील आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण
(Photo Rutuja Ahmednagar)अहमदनगर (प्रतिनिधी) - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एनसीव्हीटी नवीदिल्ली यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरु केलेल्या एनएसक्यूएफ लेव्हल-4 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार आय.टी.आय.मध्ये प्रशिक्षण घेत असतांना प्रत्यक्ष कंपनीमध्ये ए महिना ऑन जॉब ट्रेनिंग करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात अग्रेसर असणार्या विळदघाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या आय.टी.आय.मधील एकूण 372 विद्यार्थ्यांनी नगर एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग पुर्ण केले असल्याची माहिती, प्राचार्य ए.व्ही.सुर्यवंशी यांनी दिली.
सदर विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने सी.जी.पॉवर अॅण्ड इंडस्ट्रियल सोल्युशन लि., कायझेन इंजि.वर्क लि., रिहा इंजि. वर्क्स लि., सुरज गिअर्स अॅण्ड व्हॉल्वज लि., साई अक्यु कट लि. व इतरही विविध उत्पादन क्षेत्रातील नामांकित कंपन्या तसेच वर्कशॉप, शो रुम्समध्ये हे ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये ट्रेनिंग घेत असताना औद्योगिक वातावरणात प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कामाची जबाबदारी, येणार्या अडचणी, आधुनिक मशिनरीचे प्रशिक्षण यातून मिळणारे समाधान असे खूप काही शिकायला मिळाले. शिवाय अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ट्रेनिंगमध्ये मानधनही दिले. तसेच अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थींना परिक्षेनंतर लगेच पुन्हा कंपनीत काम करण्याची ऑफरही दिली.
डॉ.विखे पाटील आयटीआय नगर येथील एमआयडीसी मध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा नेहमीच मोठा फायदा होत असतो. सर्व यंत्रसामुग्रीने सुसज्य वर्कशॉप, अनुभवी शिक्षकवृंद, क्रीडा मैदान व निसर्गरम्य वातावरण यासर्व गोष्टींमुुळे संस्था जिल्ह्यात लोकप्रिय आहे.
या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पाटील, सेक्रेटरी डॉ.पी.एम.गायकवाड, डायरेक्टर डॉ.अभिजित दिवटे, डेप्युटी डायरेक्टर सुनिल कल्हापुरे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com