दीडशे कोरोना एकल महिलांना शिलाई मशिन प्रदान
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या श्रीरामपूर शहर मंडळाच्यावतीने तालुक्यातील गरजू, गरीब, होतकरु अशा दीडशे कोरोना एकल महिलांना शिलाई मशिनचे वाटप महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महिला मेळाव्यात करण्यात आले. श्रीरामपूर शहर भाजपचा हा उपक्रम सर्वांसह देशाला दिशादर्शक ठरेल, असे प्रशंसोद्गार मंत्री विखे याप्रसंगी काढले.
खा. गोविंदराव आदिक सभागृहात पार पडलेल्या महिला मेळाव्यात शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पक्षाचे महामंत्री विजय चौधरी होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार वैभव पिचड, अकोलेच्या नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, कार्यक्रमाचे संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, संयोजक तसेच शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, तालुकाध्यक्ष दीपक पटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्यात सुमारे ४५० कोरोना एकल महिला आहेत. अशा महिलांच्या घरोघर भेटी देत भाजप कार्यकर्त्यांनी सर्वेक्षण करून या महिलांची माहिती संकलित केली. त्यापैकी १५० महिलांची परिस्थीती अत्यंत हलाखीची असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शिलाई मशिनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय मिलिंदकुमार साळवे, राठी, बिंगले यांच्यासह
श्रीरामपूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यासाठी शहर व तालुक्यातील दानशुरांनी व संस्थांनी या विधायक कार्यास मदतीचा हात दिला.
या विशेष उपक्रमाचे कौतुक करताना मंत्री विखे म्हणाले, श्रीरामपूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मकतेचे उत्तम उदाहरण सर्वांसाठी घालून दिले आहे. स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील उद्योजक, डॉक्टर्स, अभियंते, व्यापारी यांनाही समाजसेवेच्या या प्रवाहात जोडण्याचे मोठे काम करून दाखविले. त्यांचा हा उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय्य उराशी बाळगून सर्व पदाधिकारी काम करीत आहेत. हा विकास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते अहोरात्र काम करीत आहेत. या कार्यकर्त्यांकडून जनतेची आलेली सर्व कल्याणकारी कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना विखे यांनी दिल्या.
आपण १५ दिवसांपूर्वी दिलेला शब्द आपण पाळला असून आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात ६०० रूपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध होईल. यामुळे वाळूमुळे फोफावत चाललेली गुंडगिरी मोडीत निघेल असा विश्वासू त्यांनी व्यक्त केला. जमिनीची मोजणी यांत्रिकीकरणाद्वारे सहज सोप्या पद्धतीने होणार असून वर्षानुवर्षे वाट पहावे लागत असल्याने तो त्रासही कमी होणार आहे. या नवीन पद्धती मुळे पंधरा दिवसात मोजणीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने घरपोहोच मिळेल, असेही विखे म्हणाले.
महामंत्री चौधरी पंतप्रधान मोदी यांच्या विविध काल्याणकारी योजनांबाबत माहिती दिली. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर भाजपने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे दीडशे महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न तर सुटला आहेच शिवाय भविष्यातही त्यांना रोजगार मिळवूण देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील. जिल्हाध्यक्ष गोंदकर म्हणाले, या चांगल्या कामासाठी समाजातील सर्वच स्तरातून भरभरून मदत मिळाली. आम्ही मदत गोळा करीत असताना अभियंते, डॉक्टर या सधन वर्गाने मदत केलीच शिवाय लॅब असीस्टंट, छोटे व्यापारी यांनीदेखील या सकारात्मक उपक्रमास भरभरून मदत केली, हाच खरा भाजपवर दाखविलेला विश्वास आहे.
प्रास्ताविक राठी यांनी केले. शहराध्यक्ष बिंगले यांनी स्वागत केले.
यावेळी श्रीरामपूर पत्रकार संघाचे नूतन पदाधिकारी अशोक गाडेकर, महेश माळवे, प्रकाश कुलथे व इतरांचा तसेच रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व केलेल्या हर्षल घुगे याचा सत्कार मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अजित बाबेल, रवी पंडित, साजिद शेख, मुन्ना शेख, विजय आखाडे, अरूण काळे, नारायण काळे, बंडू हापसे, मुकूंद लबडे, सतिश सौदागर, सुनील वाणी, संजय माखिजा, राजेश राठी, सुनील चंदन, गणेश अभंग, विशाल यादव, किरण रोकडे, जस्पाल सिंग सहाणी, राजू धामोणे, चंद्रकांत परदेशी, डॉ. ललित सावज, अरूण शिंदे, गोविंद कांदे, रवी खटोड, भरत साळुंखे, रूपेश हारकल, दत्तू देवकाते, अनिल भनगडे, महिला शहराध्यक्षा पुजा चव्हान, महिला तालुकाध्यक्षा रेखा रिंगे, राहूल आठवल, योगेश ओझा, सुजीत तनपुरे, किरण रक्टे आदी उपसथित होते.
मिलिंदकुमार साळवे यांच्या कार्याचे विखेंकडून कौतुक
संयोजक मिलिंदकुमार साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीरामपूर तालुक्यासह राज्यातील कोरोना एकल महिलांच्या प्रश्नांकडे मंत्री विखे यांचे लक्ष वेधत ते प्रश्न सोडविण्याची विनंती केली. याची दखल घेत मंत्री विखे यांनी साळवे यांनी कोरोना एकल महिला पुनर्वसनासाठी अतिशय समर्पित व निस्वार्थीपणे काम केल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com