Ahmednagar Music: दि.28 रोजी आरती दीक्षित यांचा ‘आशा-90’ कार्यक्रम
Ahmednagar Music: अहमदनगर (प्रतिनिधी): पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका आरती दीक्षित यांच्या वतीने शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी आशा 90या कार्यक्रमाचे आयोजन माऊली संकुल सभागृह, अहमदनगर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आशाताईंनी गायलेले वेगवेगळे गीतप्रकार जसे भक्ति गीते, भावगीत, गझल, मुजरा, कव्वाली, लावणी यांचे सादरीकरण होईल.
गायिका आरती दीक्षित या गेली 20 वर्षांपासून बिनाका गीतमाला, निसर्गराजा, नक्षत्रांचे गाणे, आई ये मेहेरबा.. अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करतात. अशीच नवीन संकल्पना घेऊन त्या नगरच्या रसिकाच्या भेटीस येत आहेत, हा कार्यक्रम पुणे, नगर, औरंगाबाद येथील कलाकार सादर करणार आहेत.
यात आरती दीक्षित यांच्या समवेत नगरचे सुप्रसिद्ध गायक डॉ. सत्तार सय्यद आणि पुण्याचे आकाश सोळंकी हे त्यांना साथ देणार आहेत. संगीत संयोजन राजेश देहाडे (औरंगाबाद) यांचे आहे.
नगरकर रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. देणगी प्रवेशिका प्रॉमिनंट इंग्लिश स्पोकन क्लासेस, सन्मित्र कॉलनी, सावेडी रोड, अहमदनगर व शांती ऑडिओ, नेता सुभाष चौक,अहमदनगर येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मो.9822709730 नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com