आधुनिक जीवनात समर्थ विचारांची नवी वाट दाखवणारा ‘समर्थ’ समर्थ रामदास स्वामींचे विचार म्हणजे केवळ अध्यात्म किंवा भक्तीपुरते मर्यादित नसून, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची, संकटांना सामोरं जाण्याची आणि योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देणारी विचारसंपदा. याच विचारांचा आधुनिक काळाशी संवाद घडवणारा आगामी मराठी चित्रपट ‘समर्थ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत चाललेली नाती, दोन पिढ्यांमधील विचारांची दरी आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या जीवनमूल्यांचा शोध या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. ‘समर्थ’ची कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिर…
Social Plugin