miladunnabi: पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे इंगळे प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत करुन प्रसाद वाटप
miladunnabi: अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर शहरात पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे रामवाडी व मंगल गेट हवेली येथे उत्साहात स्वागत करुन इंगळे प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष विकी इंगळे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी वसीम बागवान, अरबाज शेख, फैसल शेख व सार्वजनिक यंग पार्टी बडे बारा इमाम हवेली मंगलगेट यंग पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रामवाडी चौक येथील सर्व युवक मंडळाने आलेल्या मिरवणुकीचे अत्यंत उत्साहात स्वागत करून विविध प्रकारच्या प्रसादाचे वाटप केले. सार्वजनिक यंग पार्टी बडे बारा ईमाम हवेली मंगल गेट चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी शहरातील विविध यंग पार्ट्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.
मोहंमद पैगंबर यांच्या जयंती व गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्याने नगरमधील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणुक रविवारी काढण्याचा निर्णय घेऊन एकत्मतेचे दर्शन घडविले. या हिंदू-मुस्लिम ऐक्यचे प्रतिक या मिरवणुकीतून दिसून आले.
ही मिरवणुक भव्य व मोठ्या प्रमाणात निघालीच परंतु ठिकठिकाणी या हिंदू-मुस्लिम बांधवांनी स्वागत करुन विविध प्रकारच्या प्रसादाचे वाटप केले. यानिमित्त अहमदनगर शहरातील हिंदू-मुस्लिम समाजातील एकात्मिक भाव सर्वांना दिसून आला.
या मिरवणुकीमध्ये पोलिसांचेही मोठे सहकार्य लाभले. पोलीस प्रशासनाने अत्यंत उत्कृष्ट नियोजन करुन हा उत्सव सर्वधर्मियांनी मोठ्या आनंदाने साजरा केला.
-compressed.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com