MiladUnNabiMubarak: ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान आणि झेंडीगेट सोशल क्लब तर्फे ईद-ए-मिलाद मिरवणूकीचे उत्साहात स्वागत आणि महाप्रसाद वाटप
MiladUnNabiMubarak: अहमदनगर (प्रतिनिधी): अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद चा सण एकाच दिवशी आल्यामुळे गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून आणि आणि दोन्ही उत्सवांमध्ये शहरातून मिरवणूक काढल्या जातात त्यासाठी मुस्लिम बांधवांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी करत शासकीय सुट्टी शुक्रवारी जाहीर करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सुट्टी जाहीर करत ईद मिलादच्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या मुस्लिम बांधवांना दिल्या.
अहमदनगर शहरातही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मुस्लिम समाज शिष्टमंडळाने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आणि संपूर्ण शहरात साजरे होणारे सण शांततेत आणि एकोप्याने साजरे व्हावे यासाठी ईद मिलाद मिरवणूक ही १ ऑक्टोबर २०२३ रोजी काढणार असल्याचे निवेदन दिले आणि प्रशासनाने या निर्णयाचे स्वागत केले. त्यानुसार रविवारी ईद मीलाद मिरवणूक अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
अहमदनगर शहरातील झेंडीगेट भागात ज्येष्ठ नगरसेवक हाजी नजीर अहमद उर्फ नज्जु पहिलवान यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडीगेट सोशल क्लब तर्फे मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी झेंडीगेट सोशल क्लबचे अध्यक्ष रशीद जहागिरदार, उपाध्यक्ष एजाज सय्यद,सचिव इम्रान जहागिरदार आणि झेंडीगेट येथील सर्व युवक मंडळाने आलेल्या मिरवणुकीचे अत्यंत उत्साहात स्वागत करून विविध प्रकारच्या मिठाई आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
झेंडीगेट चौकात अत्यंत उत्कृष्ट प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या मिरवणुकीत सहभागी शहरातील विविध यंग पार्टी आणि धर्मगुरूंनी विविध नात आणि प्रेषित मुहम्मद हम्द यावेळी सादर करण्यात आल्या.
पोलीस प्रशासनाने अत्यंत उत्कृष्ट नियोजन केले त्याबद्दल रशीद जहागिरदार, एजाज सय्यद आणि इम्रान जहागिरदार यांनी पोलिसांचे आभार मानले.ईद मिलाद मिरवणुक उत्साहात आणि शांततेत पार पडली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com