इस्लाम धर्मविरोधी चित्रपट “हम २ हमारे १२” यावर त्वरित बंदी घालण्याची एमआयएम ची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) :“हम २ हमारे १२” या चित्रपटाचा काही भाग सोशल मिडीयाच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे.त्यावरुन सदर चित्रपट हा इस्लाम धर्मा विरोधी असल्याचे दिसते. त्यात असे दाखविण्यात आले आहे की इस्लाम धर्मा मध्ये स्त्रियांना कोणताच स्थान नसून त्यांना फक्त मुले जन्माची खेती असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच पवित्र ग्रंथ कुरांनाच्या एक शोल्काचा अर्धवट भागेचा अर्थ घेऊन इस्लाम धर्माला बदनाम करण्याचा कट या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यांनी केले असल्याचे दिसते.
मागील काही काळापासून चित्रपट असू की सोशल मिडिया इस्लाम धर्माला विशेषता भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. याचे एक उदहरण म्हाणजे “ केरला फाईल”.
पूर्ण देशात एक विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी इस्लाम आणि भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.या विचारसरणीच्या लोकांना भारतामध्ये त्यांचा हेतू सध्या करण्यासाठी दंगल घडवायची असल्याचे दिसते. सदर इस्लाम आणि मुस्लिमान विरोधी चित्रपट प्रदर्शित करून भारतात अशांतता निर्माण करायचा स्पष्ट हेतू असल्याचे दिसते.
यामुळे “हम २ हमारे १२” या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी तसेच या चित्रपटाला परवानगी देणारे सेन्सोर बोर्ड, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि जो जो व्यक्ती इस्लाम धर्म आणी भारतीय मुस्लिमांन बदनाम करण्याचा षड्यंत्र रचत आहे त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज उमर यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अल्पसंख्याक आयोग,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,इम्तियाज जलील औरंगाबाद खासदार तथा एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदिंना निवेदनाद्वारे केली आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com