Shah Rukh Khan: एसआरकेने चुकून आपल्या आगामी चित्रपटाचं नाव लीक केलं
Shah Rukh Khan : कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखने 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं. 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) हे त्याचे चित्रपट रिलीज झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कमाई केली. पण काही दिवसांपासून किंग खान (King Khan) रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग खान लवकरच धमाका करण्यासाठी सज्ज आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचं नाव (Shah Rukh Khan Upcoming Movie) आता समोर आलं आहे. 

एसआरकेने चुकून आपल्या आगामी चित्रपटाचं नाव लीक केलं आहे. शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. किंग खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये (Cannes Film Festival 2024) प्रतिष्ठित पियरे एंजिनीक्स एक्सेल लेंस पुरस्कार पटकावणाऱ्या सिनेमेट्रोग्राफर संतोष सिवन यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

पण यावेळी फ्रेममध्ये दिसणाऱ्या एका संहितेवर चाहत्यांचं लक्ष गेलं आहे. या संहितेच्या टायटलवर 'किंग' (King) असे लिहिलेले दिसत आहे. त्यामुळे शाहरुख खान लवकरच 'किंग' या चित्रपटात झळकणार हे स्पष्ट होत आहे. रिपोर्टनुसार, शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानदेखील (Suhana Khan) या चित्रपटात झळकणार आहे.