लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा वाचनालयाची व्यापक चळवळ
अहमदनगर (प्रतिनिधी) - संपूर्ण देशभर मतदान लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतांना काही तासांवर येऊन पोहचलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाने मतदान जागृतीसाठी व्यापक चळवळ उभी केली आहे. 7 ते 12 मे या कालावधीत विविध पातळीवर मतदानाचे महत्व व ते जास्तीत जास्त वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्या समन्वयातून ही मोहिम राबविण्यात आली.
माध्यमे सातत्याने बदलत असतांना लोकशाही प्रक्रियेत मतदान महत्वपूर्ण असल्याचे विविध व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. वाचक, सभासद, बाल वाचक, सभासद, ज्येष्ठ सदस्य, युवा वर्ग, नगरमधील विविध कलाकार तसेच संचालक मंडळ यांनी या आपल्या वैशिष्टयपुर्ण कलाकृतीत विविध संदेशातून लोकशाहीचा हा उत्सव ‘साजरा करण्यासाठी मतदारांना साद घातली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॅटस्अप यांच्या माध्यमातून लाखो जनतेपर्यंत हा अनोखा प्रयोग घेऊन जाण्यात आला.
तसेच वाचकांना मतदानाची शपथ, माहिती पत्रकाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रभाकर सुरकुटला, ज्ञानेश्वर वल्लाकट्टी, राजकुमार मुनोत, मनोज मुनोत, सखाराम गोरे, कवी चंद्रकांत पालवे, संचालक किरण आगरवाल, विक्रांत ठुबे, शिक्षिका मनिषा बोर्डे, कदम, सौ.घबाडे, ग्रंथपाल अमोल इथापे, सह.ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, अभिनेते नितीन जावळे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, संचालक मंडळ, वाचनालय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com