संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी - आयुक्त यशवंत डांगे

संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी - आयुक्त यशवंत डांगे













अहमदनगर । दर्शक : 

   गणेशोत्सव संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपुर्ण देश उत्सावानिमित्त सजलेला आहे. या उत्सावाच्या माध्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. नगरमधील संकल्प युवक मंडळाने गणेश उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम घेवुन सामाजिक संदेश दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.



     संकल्प युवक मंडळाच्या वतीने श्री गणेशाची आरती मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच यावेळी त्यांचा मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार मंडळाचे मार्गदर्शक नरेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. 



मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी मंडळात काम करणारे अध्यक्ष कृष्णा टेमक, उपाध्यक्ष विशाल मिसाळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक कामामुळे त्यांना शब्बासकीची थाप दिली. यावेळी आयुक्तांच्या हस्ते अनंत गाली यांना सामाजिक कार्यासाठी 11000/- धनादेश देवुन देविदास मुदगल, संतोष पठाडे, भगत पैलवान यांचा सत्कार करण्यात आला.


     याप्रसंगी मंडळास विशेष सहकार्य अजय लयचेट्टी यांचे लाभले. यावेळी मंडळाचे राहुल मिसाळ, रोहित मुळे, सौरभ दांडवते, स्वप्निल देशमुख, संकेत जकाते, शुभम सुंकी, समर्थ परदेशी, श्रीनिवास पुनतांबेकर आदींसह सर्व सभासद उपस्थित होते.


     यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा टेमक म्हणाले कि, संकल्प युवक मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सवा मोठ्या उत्साहात साजर करण्यात येतो. मंडळाच्यावतीने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामजिक उपक्रप घेण्यात आले. यावर्षी उत्सवानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, प्रसादाचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, असे उपक्रम घेण्यात आल्याचे सांगुन वर्षभरात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली.


     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय लयचेट्टल यांनी केले तर आभार रोहित मुळे यांनी मानले.