Dandiya | शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगला महिलांचा दांडिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी दांडिया व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धेत सहभागी होऊन महिलांनी बक्षीसे मिळवली. तर दांडिच्या तालावर महिलांसह युवतींनी ठेका धरला होता. नवरात्रनिमित्त दररोज मंदिरात महिलांचा भजनाचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला.
श्री राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट व सेवाप्रीतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला. प्रारंभी महिलांसाठी विविध बौध्दिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. देवी माताच्या जीवनावर प्रश्नोत्तरी तंबोलाचे विशेष स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ महिला देखील सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात रास गरबा व दांडिया नृत्य रंगले होते. दांडियाच्या कार्यक्रमात संगीताच्या तालावर युवक-युवतींचा उत्साह संचारला होता.
विविध स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अन्नू थापर, डॉ. सिमरन वधवा, अर्चना खंडेलवाल, गितांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड, रितू वधवा, सविता चड्डा, स्विटी पंजाबी आदी उपस्थित होत्या. शेवटी देवीची आरती करुन प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com