"मै जिंदगी का साथ निभाता चला गया" गीतकार, शायर साहिर लुधियानवी दृकश्राव्य कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन
नगर - हमारी याद आयेगी" प्रस्तुत महान कवी, गीतकार शायर साहिर लुधियानवी यांच्या अदभूत जीवन प्रवासावर आधारीत "मै जिंदगी का साथ निभाता चला गया " दृकश्राव्य कार्यक्रमाचे संकलन, व्हिडिओग्राफी, सादरीकरण उस्मान शेख (फलटण ) करणार आहेत.
जीवन प्रवास उलगडताना मोठ्या पडद्यावर प्यासा, हम दोनो, वक्त, गुमराह, हमराज , धर्मपुत्र, ताजमहल, चित्रलेखा इत्यादी अनेक हिंदी चित्रपटातील आशयघन गाणी, दृश्य दाखविली जाणार आहेत, त्या मागची निर्मितीची कहाणी याशिवाय जेष्ठ लेखिका अमृता प्रीतम, गायिका सुधा मल्होत्रा चित्रकार इमरोज सोबतचे मैत्रीचे अनवट किस्से कथन करणार आहेत.
शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता रहेमत सुलतान हॉल, अहिल्यादेवी शाळे समोर, सर्जेपुरा चौक अहमदनगर येथे आयोजित केला असून प्रवेश विनामूल्य आहे. कार्यक्रमाचे आयोजन नंदकिशोर आढाव व दिलीप अकोलकरांनी केले. प्रांजली पेस्ट कंट्रोल सर्व्हिस, रोनक असोसिएट्स प्रायोजक आहेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com