शिक्षक भारतीच्या प्रयत्नाला यश-सुनील गाडगे
अहमदनगर । दर्शक :
राज्यातील खाजगी अल्पसंख्यांक शाळेतील रिक्त पदापैकी ८०% पदे भरण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ५०% पदे भरण्यासंबंधी आदेश होता, आता राज्यातील अल्पसंख्यांक शाळामधील रिक्त पदापैकी ८०% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात
कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांशी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असुन अल्पसंख्यांक शाळामधील ८०% पदभरती करण्याचा निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न कपिल पाटील यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून सोडवले आहेत त्यापैकी हा एक प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे त्याबद्दल शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.
अल्पसंख्यांक शाळांमध्ये 80% टक्के पदभरती आदेश निर्गमित झाल्याबद्दल शिक्षक नेते तथा शिक्षक भरतीचे राज्य सचिव सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,
अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कैलास जाधव, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार,
कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, सोमनाथ बोंतले, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे,
महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले
x

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com