Bollywood Dandiya | क्रिएटर डान्स अकॅडमी च्या वतीने दि 5 ऑक्टोंबर रोजी महिलांसाठी मोफत बॉलीवूड दांडिया नाईट चे आयोजन
अहमदनगर । दर्शक :
शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी, ड्रेपरी व झुंबा फिटनेस च्या वतीने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंधन लॉन्स येथे मोफत बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक दिनेश फिरके यांनी दिली.
हा बॉलीवूड दांडिया नाईट फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. जेणे करून त्यांना स्वतंत्र, सुरक्षित व एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने ह्या बॉलीवूड दांडिया नाईट चे आयोजन करण्याचा उद्देश आहे. यामध्ये विविध दांडिया व गरबाचे प्रकार खेळण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी फूड स्टॉल सुद्धा ठेवण्यात येणार आहे, यामध्ये विविध बॉलीवूड आणि गरबा गु्रप डान्सचे सादरीकरण होणार आहे.
तसेच सहभागी महिलांना लकी ड्रा मध्ये ऑक्सोडाईज ज्वेलरी सेट, इंडोवेस्टन घागरा, कोरीयन ग्लास फेशियल, कॅरेटीन स्पा, हेअर स्टेटनिंग असे असंख्ये प्रकारचे पारितोषिके देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या दांडिया नाईट मध्ये सहभागी होण्याचे आवाहन क्रिएटर डान्स अकॅडमी च्या वतीने करण्यात आले.
या बॉलीवूड दांडिया नाईचे 6 वे वर्ष असून कार्यक्रमाचे नियोजन भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले आहे. या बॉलीवूड दांडिया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. धनंजय जाधव उपस्थित राहणार आहे. या बॉलीवूड दांडिया नाईट साठी बंधन लॉन्स, नगरी व्हिलेज, हॉटेल कृष्णा एक्झोटीका, कॅफे अर्बन व्हिलेज,
फोटोग्राफर अक्षय भोकरे व रेडिओ पार्टनर 104 एफएम यांचे सहकार्य आहे. या बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये सहभागी होण्यासाठी क्रिएटर्स ड्रेपरी, दिल्ली गेट व हॉटेल नगरी व्हिलेज, पाईपलाईप रोड येथे मोफत पास मिळतील. अधिक माहितीसाठी 81 49 99 91 49 यांच्याशी संपर्क साधावा.
जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अॅड.धनंजय जाधव यांनी केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com