Ahmednagar Vidhansabha | शहरातील महाविकास आघाडीतील बिघाडी कायम ; प्रा.गाडेंच्या उमेदवारीमुळे शहरात तिरंगी लढत
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडीतील बिघाडी कायम
अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत नगरच्या महाविकास आघाडीतील बिघाडी सोडविण्याचा मोठा प्रयत्न झाला परंतु उद्धव सेनेतील प्रा गाडे यांनी आपला अर्ज मागे न घेता निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याने त्यांच्या बंडाळीने नगर शहरातील निवडणूक तिरंगी होणार असे दिसते.
शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) गटाने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते.सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्ज भरताना शिवसेनेचे विक्रम राठोड सोबत होते आणि अर्ज माघारी घेताना ते माघारी उमेद्वारांसोबत नव्हे तर आघाडीतील बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणारे उमेदवार प्रा शशिकांत गाडे यांच्या सोबत दिसले त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीतील बिघाडी जास्तच बिघडलेली आहे असे दिसते.
आज अर्ज माघारीची दिवशी शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे तसेच अपक्ष सुवर्णा कोतकर यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर शिवसेनेचे शशिकांत गाडे यांचा अर्ज कायम राहिला आहे.
त्यामुळे आता नगर शहरात तिरंगी लढत होणार असून महायुतीकडून आमदार संग्राम जगताप तर महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर तर अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांच्यात लढत होणार आहे. नगर शहरात आता तिरंगी लढत होणार का? गाडे हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणारा याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीतील उद्धव सेनेचे शशिकांत गाडे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात
नगर शहर विधानसभा मतदार संघात २७ उमेदवारानी ३७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागारीच्या दिवशी दहा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. यामध्ये कुणाल भंडारी, मदन आढाव, विजयकुमार गोविंदराव ठुबे, गोरक्षनाथ दळवी, शोभा बडे, किरण काळे, वसंत लोढा, सुवर्णा कोतकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे.
महायुतीकडून संग्राम जगताप तर महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर अपक्ष म्हणून शशिकांत गाडे हे ही निवडणूक रिंगणात आहेत.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार जोरात सुरु असून शहरातील विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करताना नगरकर
शहरातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते शरद पवार राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर यांना पाठींबा मिळणार कि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रा शशिकांत गाडे यांच्या सोबत जाणार कि या दोघांच्या आघाडीतील बिघाडीचा सरळ-सरळ फायदा होत विजयाची हॅट्रिक करून अजित पवार राष्ट्रवादीचे संग्राम जगताप पुन्हा आमदार होणार याबाबत जिल्हाभरात उत्सुकता लागून राहिली आहे.




0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com