कोतकर,काळे,फुलसौंदर आणि बोराटे यांची निवडणुकीतून माघार ; संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर लढत
नगर दि.4 नोव्हेंबर २०२४
अहमदनगर शहर विधानसभेची निवडणूक आणि अर्ज भरताना झालेली भाऊगर्दी पाहता युती आणि आघाडीचे अनेक उमेदवारांनी अर्ज भरून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि अर्जही भरले महाविकास आघाडीतही बंडखोरी केली आणि महायुतीतही बंडाळी झाली असल्याचे चित्र निर्माण केले मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच आज ४ नोव्हेंबरला महाविकास आघाडीची बिघाडीहि सुधारली आणि युतीतही एकजूट झाली असल्याची चर्चा आहे.
वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची झालेली बैठक महायुतीच्या तिढा सोडविण्यासाठी निर्णायक झाली असेच म्हणावे लागेल आणि बाळासाहेब थोरात ,नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील बिघाडी सुधरवण्यात यश मिळविले असल्याचे सध्या तरी दिसत आहे आता सरळ लढत अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी अशीच होणार हे मात्र स्पष्ट झाले आहे
शहर विधानसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडी मधील माजी महापौर भगवान फुलसौंदर,काँग्रेसचे किरण काळे,नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून अर्ज माघारी नंतर सर्वजण मिळून महाविकास आघाडीचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया सर्व नेत्यांनी दिली आहे.
शहर मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चांगलीच चर्चा सुरू होती. शेवटच्या क्षणी महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
अपक्ष उमेदवार सुवर्णाताई कोतकर यांनीही आपला अर्ज मागे घेतला असून त्यामुळे आता नगर शहर मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com