Top News

पुस्तके आपल्याला घडवणारे खरे गुरु - लेखिका साधना महानोर

 नगर जिल्हा वाचनालयात पुस्तक दिनी पुस्तक प्रदर्शन 





नगर - माणसाच्या आयुष्यात आलेली पुस्तके व त्यातून आपल्यावर झालेले संस्कार आपल्या जीवनाची दिशा निश्चित करतात. पुस्तके व त्यातून मिळणारे संस्कारआपल्याला घडवणारे खरे गुरु आहेत" असे प्रतिपादन "रेघोट्या"  च्या संचालिका व लेखिका साधना महानोर यांनी केले. 

        
 जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जागतिक पुस्तक दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात आयोजित पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी  बि.डी.महानोर ,वाचनाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे ,संचालिका प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,संचालक राहुल तांबोळी, किरण अग्रवाल, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल, उपस्थित होते.


       पुढे बोलताना साधना महानोर यांनी स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाविषयी सांगताना "आपण स्वतः शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलो.लहानपणापासून पुस्तकांची आवड ,वाचनाचे झपाटलेपणाचे संस्कार मला सातत्याने घडवत गेले. पुढे उच्च शिक्षण घेऊन व उच्च पदाची नोकरी असताना तेथे मन मात्र रमले नाही. आतला "हृदयाचा" आवाज ओळखून पुन्हा लेखन ,पत्रकारिता, जाहिरात लेखन,पटलेखन,मालिका ते सुभाष घई यांच्या प्रतीत यश व्यक्तीच्या चित्रपटात लेखनातून मिळालेले संधी व यश हे खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे ठरले. पुस्तकानेच आपल्याला घडवले असे कृतज्ञपणे सांगताना साधना महानोर यांनी जिल्हा वाचनालय असे हजारो साहित्यिक व लेखक घडविण्याचे लोकप्रभिमुख कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.


         प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी "वाचन हे जसे माणसाची मने घडवते तसेच ते माणसाच्या संवेदना, भावभावना यातून निरोगी शरीरासाठी देखील कार्य करते.जगभरात ज्या महान व्यक्ती घडल्या व आजही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून असामान्य कर्तृत्व गाजवणारी पिढी ही देखील वाचनातून समृद्ध होते आहे. हा वाचन संस्कृतीचा वारसा जिल्हा वाचनालय वाचनालय सुमारे द्विशतक अखंडपणे चालवत असल्याचे सांगितले.


     बि. डी. महानोर यांनी आपल्या मनोगत "आपल्या तत्कालीन परिस्थितीत पुस्तकाच्या संस्काराने आपण घडलो. नवीन पिढीच्या माहिती तंत्रज्ञान युगातही पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा वारसा चालवण्याचे हे कार्य जिल्हा वाचनालय सातत्याने करत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


       यावेळी कवी चंद्रकांत पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन आणि लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शनाचे उद्घाटन सौ साधना महानोर यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्योती कुलकर्णी सत्कार प्राध्यापक शिरीष मोडक तर आभार दिलीप पांढरे यांनी मानले.


      याप्रसंगी प्राध्यापक गणेश भगत, अविनाश रसाळ,देशपांडे, पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, संकेत फाटक ,संजय गाडेकर , निखिल ढाकणे उपस्थित होते.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने