कोतकर कुटूंबानी केले मांजरीच्या पिल्लांचे पाचवी पूजन
नगर -यांत्रिक व धावपळीच्या युगातही जुन्या रूढी, परंपरा आजची पाळल्या जात आहेत.बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजनाची प्रथा आजही टिकून आहे. सटवाई देवी बाळाला आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरवात करते. त्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो अशी या विधीची आख्यायिका आहे.मात्र प्राणी प्रेमी असलेल्या कोतकर कुटूंबानी आपल्या घरातील सदस्य मांजरीच्या पिल्लांची पाचवी पूजन मोठ्या उत्साहात व धूम धड्याक्यात केले त्यासाठी घरासमोर मंडप टाकण्यात आला होता
सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे नगर जिल्हा अध्यक्ष,धार्मिक कामात अग्रेसर असणारे प्राणी मात्रा वर प्रेम करणारे नगर जवळील बाबुर्डी घुमट येथील गंगाधर कोतकर यांच्या घरी असलेल्या पाळीव मांजर सगुणा उर्फ वाघाची मावशी नाव असलेली हि बाळंतीण झाली. तिच्या पोटी गोंडस चार बाळे झाले यामुळे कोतकर परिवारांचा आनंद गगनात मावणारा नाही असा झाल्याने मावशीच्या बाळांची पाचवी पुजनाचा चा कार्यक्रम साजरा करण्यात आला
यावेळी गंगाधर कोतकर,मंदाकिनी
धार्मिक पूजा करून पुरण पोळीची जेवणाची पंगत देऊन व नंतर रात्री आठ पासून संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये रावसाहेब महाराज परकाळे,सुरेश महाराज बडे, तबलावादक शेखर दरवडे, तुकाराम महाराज राऊत योगेश महाराज खांडके ,संपत महाराज दानवे, हौसराव मगर,अविनाश महाराज राऊत,विठ्ठल देवकर यांनी भजने गायली त्यांना समस्त भजनी मंडळ बाबुर्डी घुमट यांनी साथ दिली
या पूर्वीही या कुटूंबाने गाईचे डोहाळे जेवण केले होते नातेवाईक आणि मित्र परिवाराला बोलावून पाहुणचार केला होता त्याच्या या पूजनाचे पंचक्रोशीत जोरदार चर्चा असून असून प्राणीप्रेमी व ग्रामस्थ त्याचे कौतुक करत आहे
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com