तपोवन रोडला श्री. स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथीला भाविकांची गर्दी
नगर - अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठाचे दिंडोरी प्रणित सावेडी उपनगरात तपोवन रोडवरील श्री.स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथी उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात भाविकांच्या उपस्थितीत महाआरती होऊन महाप्रसादाने झाली.
नाशिक जिल्ह्यातील श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र तपोवन येथे स्थापन झाले असून दरवर्षीप्रमाणे श्री. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी उत्सवानिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते.
या सप्ताह मध्ये केंद्राचे सर्व सेवेकरी पुण्यतिथी निमित्त एकत्रितपणे येऊन सेवेचे व्रत जोपासले होते. पहाटे महाअभिषेक, सकाळी औदुंबर प्रदक्षिणा, भूपाळी आरती, पारायण सोहळा, नैवेद्य आरती असे कार्यक्रम पार पडले. सामूहिक श्री. गुरुचरित्र वाचन नित्यस्वाहाकार मध्ये 174 महिलांनी सहभाग घेतला होता.
सप्ताहाची सांगता श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथी ला उत्साहात झाली. यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी उपस्थित राहुन या केंद्राने सुरू केलेल्या बालसंस्कार वर्गामुळे मुला मुलींवर होणारे आध्यात्मिक संस्कार भविष्यात उपयोगी पडतील. धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सर्व सेवेकरी एकनिष्ठेने करतात हे कौतुकास्पद आहे. असे सांगितले.
दुपारी नैवेद्य आरती झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ज्येष्ठ सेवेकरी श्री व सौ एकनाथ कौशल्या खिलारी यांचे हस्ते स्वामी समर्थ यांची आरती करण्यात आली. तपोवन रोडवरील हे स्वामी समर्थ केंद्र अहिल्यानगर मध्ये एक नंबरचे आध्यात्मिक कार्य करत आहे त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी येथे होत असल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com