Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

 Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची  आवक वाढली 



          


नगर-फळांचा राजा असलेल्या आंब्याचे नगरच्या बाजारात आगमन होऊन दीड महिना झाला आहे,परंतु आवक कमी होती.परंतु अक्षय तृतीया मुळे  देवगड,रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत आंबे उपलब्ध आहेत.




त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. अशी माहिती नवीपेठेतील  पप्पू आहुजा आब्यांचे आढीचे संचालक कैलास आहुजा यांनी दिली



      दिनांक ३० एप्रिलला अक्षयतृतीया मुळे नगरमध्ये अब्याची आवक वाढली आहे.तर सध्या लालबाग आंबाच्या दर  ४०० ते ५०० रुपयात दोन डझनची करंडी मिळत  असून ओरिजनल हापूस १००० ते १६०० रुपये २ डझनची पेटी मिळत आहे   


    

           केरळचेन्नईहैदराबाद,कर्नाटक तसेच कोकणातून सुमारे ३० ट्रक हापूस,बदाम,लालबाग,मद्रास अंबा आला आहे.एका ट्रकमध्ये साडेसहाशे पेट्या असतात.एका पेटीत दोन ते अडीच डझन आंबे असतात.सध्या नवीपेठेतील पप्पू हुजा आंब्याच्या  आढी वर  प्रतवारी करण्याचे काम जोरात सुरु आहे,दरवर्षी अक्षय तृतीयेला सर्वात जास्त आंब्याची विक्री सगळीकडे होत असते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या