सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली
त्यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हणाले कि माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील.
त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना., अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
मा.आमदार अरुणकाका जगताप यांचा अल्प परिचय
सन १९८६-१९८७ पासून युवक कॉंग्रेस चे शहराध्यक्ष म्हणून राजकारणास सुरुवात.
सन १९८९ मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली.
सन १९९१ ते १९९६ दरम्यान नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.
सन १९९२ पासून आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ, वै.गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल चे अध्यक्ष पदी नेमणूक व गुणे आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा केली.
सन १९९९ मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली.
सन २००३ पासून अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तसेच सन २००८ पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदी नियुक्ती
सन २००३ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून अहमदनगर महानगरपालिका स्थापनेचा कलश शहरात आणला.
सन २००५ साली श्री.संदिप कोतकर यांना महापौर करण्यात मोलाचे योगदान.
सन २००६ साली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.
सन २००८ अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी तसेच पुत्र संग्राम जगताप यांना महापौर केले.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड चे सिनेट सदस्य पदावर नियुक्ती.
दि. २३ डिसेंबर २००९ रोजीच्या विधानपरिषद निवडणुकीत आमदार पदी विजयी व दुसऱ्यांदा ३० डिसेंबर २०१६ रोजी विजयी.
धाकटे चिरंजीव श्री.संग्रामभैय्या जगताप यांना सन २०१४, २०१९, २०२४ साली शहराचे आमदार म्हणून निवडून आणण्यात मोलाचे योगदान.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड.
थोरले चिरंजीव सचिनभाऊ जगताप यांना जिल्हा परिषदेचे सदस्यपदी निवडून आणण्यात मलाचे योगदान
सन २०२०-२०२१ कोरोना संकट काळात शहरातील व जिल्ह्यातील सर्वसमान्य गरजू नागरिकांना आधार देत धान्य पुरवठा करूनआरोग्य सुविधा देऊन अनेक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच आ.संग्राम जगताप यांच्या साथीने गुणे आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु करून ऑक्सिजन प्लांट उभारला.
अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा बॉडी बिल्डींग असो., अहमदनगर.
राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित.
अहमदनगरमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावर हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
राज्यस्तरीय मानाच्या महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डींग स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
शहरातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक इ. क्षेत्राला सहकार्य करत विविध कार्यक्रम घेण्याबाबत नेहमीच पुढाकार तसेच अनेक मंदिरे उभारून सर्व जातींच्या संतांचे सांस्कृतिक भवन उभारले.
दि.०५ एप्रिल २०२५ रोजी पुण्यात रुबी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल. दि.०२ मे २०२५ रोजी पहाटे दु:खद निधन.



0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com