Khisti Samaj | दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णत्व आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह- सुप्रिया निमिष लोहाळे ; ख्रिस्ती वधू- वर मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद
Khisti Samaj | नगर : दर्शक । साप्ताहिक उपदेशक नगर आणि सेंट जॉन दि बाप्टिस्ट चर्च ,गोंधवणी श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ख्रिस्ती वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सिने दिग्दर्शक, टीव्ही मालिका दिग्दर्शक, लेखक सन्माननीय निमिष लोहाळे, संभाजीनगर हे होते.प्रमुख मार्गदर्शिका सुप्रिया निमिष लोहाळे, प्रसिद्ध निवेदिका अधिपरिचारिका, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, संभाजीनगर ह्या होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात अतिशय मौलिक विचार मांडून, इच्छुक वधू-वर व पालक यांना संबोधित केले."दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतः आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह" या त्यांच्या विचाराने सर्वांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
या मेळाव्यात ख्रिस्ती समाजातील वधू वर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. प्रस्तावना साप्ताहिक उपदेशकचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केली.या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी सेंट मार्टिन चर्च ,कोल्हारचे प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह.डेव्हिड मेश्रामकर हे होते.संगीता गोडे, ॲड.प्रदीप सिंग, अविनाश काळे यांचेही मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चचे सेक्रेटरी उदयसेन राठोड,अहमदनगर मराठी मिशनचे सेक्रेटरी डी.जे. भांबळ, विजयाताई जाधव,संतोष सगळगिळे, पास्टर अण्णासाहेब अमोलिक, सुभाष खरात, राजेश कर्डक,पीटर बनकर,अरुण मोहन, मोजेस चक्रनारायण, पत्रकार दीपक कदम, अमोल कदम अजितकुमार सुडगे यांची उपस्थिती होती. विकास प्रभुणे, मिलिंद ठोकळ, बाळासाहेब कसबे,मकरंद चांदेकर, कार्तिकी चांदेकर, कविता गायकवाड, अनिल दुशिंग, मयूर अमोलिक,निखिल चांदेकर, सनी साळवे ,जॉनी दिवे,यश पारखे,स्तवन प्रभूणे, प्रेम ठोकळ, राज ठोकळ, ब्र.आंद्रेस यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास बीड ,संभाजीनगर, कल्याण ,पुणे, अ.नगर नाशिक, शेवगाव इत्यादी ठिकाणाहून विवाहइच्छुक वधू वर पालकांची उपस्थिती होती. प्रसंगी प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी चर्च सेक्रेटरी उदयसेन राठोड,सौरभ जाधव, रूपाली जाधव, ॲड. प्रदीप सिंग यांचे अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेश्वरदादा पारखे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले .आभार प्रदर्शन प्रकाश लोखंडे यांनी केले. कार्यक्रमास चर्चचे प्रमुख आचार्य रेव्ह.अनिल वंजारे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व कार्यक्रमाच्या आयोजनात अविनाश काळे यांचा मोलाचा वाटा होता.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com