Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या पुढाकाराने कामगार दिननिमित्त अग्निशमन दलासाठी दंततपासणी शिबिराचे आयोजन
अहमदनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने आज कामगार दिनाचे औचित्य साधत दिनांक 1 मे रोजी अग्निशमन केंद्र,नगर येथे अग्निशमन दलातील जवानांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. “प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ” या उद्दिष्टाने हे शिबिर घेण्यात आले असून, या शिबिरात एकूण ३५ अग्निशमन दलातील जवानांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष रो. डॉ. कुणाल कोल्हे यांच्या हस्ते तर त्यांच्या व त्यांच्या टीम मार्फत तपासणी करण्यात आले. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री. शंकर मिसाळ सर, माजी प्रांतपाल रो. शिरीष रयाते, रो. अमर गुरप, राजीव गुजर, मनीष बोरा, इश्वर बोरा, हरीश नय्यर, विनोद बोरा व चेतन अमरापूरकर आदी सदस्य तर अक्षय आव्हाड, फायरमन
भरत पडगे, शुभम गावडे, सूरज पोकळे आदि उपस्थित होते.
श्री. मिसाळ सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जसे अग्निशमन व्यवस्थेच्या नियमित देखभालीअभावी गंभीर घटनांना तोंड द्यावे लागते, तसेच आरोग्याच्या बाबतीतही दुर्लक्ष केल्यास त्रास वाढतो. नुकत्याच पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद येथे झालेल्या आगीच्या घटनांमधून याचे भयावह चित्र समोर आले आहे. अग्निशमन यंत्रणा असूनही तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर परिणाम उद्भवतात. हाच संदेश आरोग्यविषयक तपासण्यांमधूनही मिळतो.”
रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. कुणाल कोल्हे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, फायर फायटर्स हे समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे नायक असून, त्यांचे आरोग्य उत्तम राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आरोग्यासंबंधी नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय हेच आजच्या काळात अत्यंत आवश्यक झाले आहेत.
ज्या प्रकारे अग्निशमन यंत्रणा वेळेवर कार्यान्वित राहण्यासाठी तपासणी आणि देखभाल आवश्यक असते, त्याच प्रकारे आपल्या शरीराचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, आपण अनेक वेळा आरोग्याबाबत गाफील राहतो आणि आजार बळावल्यावरच उपचार घेतो. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्यामुळेच रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलने या दंत तपासणी शिबिराचा उपक्रम हाती घेतला असून, हे केवळ तपासणीपुरते मर्यादित न राहता आरोग्यविषयी जागरूकतेचा संदेश देणारे पाऊल आहे.
या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख रो. गिरीश मुळे यांनी विशेष योगदान दिले. यावेळी रो. राजीव गुजर यांनी सांगितले की, “फायर सेफ्टी आणि जनजागृतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल कटीबद्ध असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील.”
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोटरी सेंट्रल चे भावी सचिव रो. अमर गुरप यांनी केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com