माजी विद्यार्थी ओंकार खुंटाळे यांची यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार
Satkar | नगर : दर्शक ।
येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय,बोल्हेगाव येथील माजी विद्यार्थी ओंकार राजेंद्र खुंटाळे यांची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा(यू.पी.एस.सी-सी.एस.इ)
यावेळी बोलताना डॉ.क्षितिज घुले म्हणाले की,अभ्यासाबरोबर आत्मविश्वासाची जोड असेल तर अशक्य असणारे ध्येय,यश सहजरीत्या मिळवता येते. स्वतः मधल्या विश्वासाला जर जिवंत ठेवता आले तर कुठलेच अपयश आपल्याला यशापासून रोखू शकत नाही.प्रयत्न करत असताना हार मिळाली म्हणून न थांबता त्यात सातत्य ठेवले तर यश हे नक्कीच मिळते असे ओंकारच्या बाबतीत घडले आहे याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे असे गौरव उद्गार त्यांनी सत्कार प्रसंगी काढले.
सत्कारमूर्ती ओंकार खुंटाळे यावेळी आपले अनुभव व्यक्त करताना म्हणाले की, अपयशाने खचून न जाता प्रयत्नांचे सातत्य हेच यशाचे रहस्य आहे.या कॉलेजने राष्ट्रीय सेवा योजना सहभाग तसेच वकृत्व स्पर्धेसाठी दिलेली संधी तसेच विविध सांस्कृतिक व शिवजयंती उत्सव निमित्त सूत्रसंचालना मध्ये कॉलेजने मला दिलेली लीडरशिप तसेच कॉलेजमधून स्वतःचा सामाजिक जाणवेचा आलेख उंचावत गेलेला दिसून आला असे मत यावेळी व्यक्त केले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.के.पंदरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थी आणि प्राध्यापकां दरम्यानचा संबंध हा शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली आहे. प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात,त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवतात, तर विद्यार्थी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे पालन करतात, अभ्यास करतात आणि ज्ञान मिळवतात.या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश वाढते आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. प्राध्यापकांच्या प्रामाणिक मार्गदर्शनामुळे विद्यार्थी घडत असतात यापुढेही ओंकार खुटाळे सारखे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.के.आर.पिसाळ यांनी केले तर आभार प्रा.एस.व्ही.मरकड यांनी मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस.बी.दहातोंडे यांनी केले.या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य प्रा.पी.ए.फटांगरे, संगणक विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.ए.शेख,कार्यालय अधीक्षक श्री.पी.व्ही.दळवी,ऋतिक ताकपेरे,अल्तमश शेख,श्यामा वाळके तसेच प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी ओंकार खुंटाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com