Nagar Police Satkar | मेंढपाळांच्या पालावर दरोडा टाकणार्या आरोपींना अटक
Nagar Police Satkar | नगर : दर्शक ।
दि. 9 जून रोजी रात्रीच्या सुमारास सशस्त्र टोळीने पिंपरीघुमट (विळद) येथे मेंढपाळांच्या पालावर दरोडा टाकून त्यांच्यावर अमानुष मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 447/2025 भा.दं.वि. कलम 310(2), 311 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी याआधीही मांजरी शिवार (ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथेही अशाच प्रकारे मेंढपाळांवर हल्ला करून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
मेंढपाळ समाजाचे जीवन कायमच संकटात आहे. रात्रीच्या वेळी पालांवर दरोडे टाकणार्या टोळ्यांनी मेंढपाळांचे जीवन असुरक्षित केले आहे. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपींना अटक केली, याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचा सत्कार करण्यात आला. आरोपी अटक केल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. हा एक सकारात्मक संदेश असून, आम्ही त्यांच्या कार्याचे धनगर समाजाच्यावतीने कौतुक करण्यात येत आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देवुन मागणी करण्यात आली आहे की, अशा सशस्त्र टोळ्यांवर कठोर कारवाई करत संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.
यावेळी बोलतांना सखाराम सरक म्हणाले की, या घटनेनंतर राज्यभरातून मेंढपाळ समाजात संतापाची लाट उसळली होती. मात्र पोलीस यंत्रणेच्या सक्रियतेमुळे आरोपी गजाआड गेले असून, आता ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केल्यास अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलल्याचा विश्वास जनतेला बसेल,
राज्य शासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहावे व असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी सशक्त यंत्रणा उभारावी. मेंढपाळ बांधवांचा व्यवसाय सुरक्षित असावा, हे शासनाचे कर्तव्य आहे, असे आवाहन सरक यांनी केले.
ही घटना केवळ चोरीची नसून, मेंढपाळ समाजाच्या जीवनशैलीवर झालेला हल्ला आहे. म्हणूनच अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com