Andolan Nagar | 51 गुंठे जमीन चोरी प्रकरणी  अप्पर तहसील यांचा सरोदे आज्जीच्या बाजूने निर्णायक निकाल

Andolan Nagar | नऊ दिवस तहसील कार्यालयात शेळी मेंढी आंदोलन सत्याग्रहची यशस्वी सांगता






Andolan Nagar |  नगर : दर्शक । 


      तालुक्यातील बहुचर्चित चिंचोंडी पाटील गावातील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या जमीन गट नं 1026 उताऱ्यावरून 12 वर्षापूर्वी बेकायदेशीर तत्कालीन तलाठी यांना हाताशी धरून चोरी झाली होतीसदर जमीन बेकायदेशीर गावगुंडांनी स्वतःच्या नावावर लावली होती,ही बाब 2020 सरोदे परिवार जेव्हा कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये  ऍडमिट झाले तेव्हा समाजकंटक गावगुंडांनी त्यांचे घर पाडून त्यांना बेघर केले होते तेव्हा ही बाब उघडकीस आली.तेव्हापासून या परिवाराचा लढा सुरू होता.





          या प्रकरणावर आतापर्यंत तहसीलदार,सर्कल,महसूल प्रशासनासमोर 25 सुनावण्या झाल्या.या सदर गाव गुंडाने यामध्ये कधीही कुठलेही खरेदीखत,साठेखत,गहाणखत,बक्षीसपत्रअसे कुठलेही अधिकृत डॉक्युमेंट सादर करू शकले नाहीत,परंतु प्रत्येक वेळेस सदर केस प्रकरण निकालावर आल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना माहिती अधिकाराचे नियम व माहिती अधिकारातच्या बातम्या व राज्यातील एखाद्या कोर्टाने दिलेला निकाल


 



त्या ठिकाणी दाखवून व सदर प्रकरण राजकीय असल्यासारखे भासवून व महसूल व तहसील अधिकाऱ्यांवर निकालासाठी प्रचंड वेळोवेळी दबाव आणला,या प्रकरणात आत्तापर्यंत चार आंदोलन सरोदे परिवार व सरपंच शरद पवार यांनी केले व शेवटचे शेळी मेंढी आंदोलन हे राज्यात जिल्ह्यात प्रथमच शेळ्या मेंढ्या घेऊन शेतकरी तहसीलदार यांच्या दालनात घुसल्याने 51 गुंठे जमीन चोरीची जोरदार चर्चा झालीत्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले 




          राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे निकालावर आलेली सदर केस नगरचे तहसीलदार संजय शिंदे  यांच्याकडून नगर शहराचे अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे  यांच्याकडे वर्ग करण्यात आली व यावर सरपंच शरद पवार यांनी या प्रक्रियेवर आक्रमक आक्षेप घेत शेळी मेंढी आंदोलन आणखी तीव्र केलेत्यावर महसूल प्रशासनाने तातडीने वार मंगळवार दिनांक 18/06/2025 रोजी तातडीने सुनावणी घेऊन प्रतिवाद्यांना खरेदीखत सादर करण्याचे आदेश देताच प्रतिवादाने खरेदीखत घरी राहिले आहे,







खरेदीखत वकिलाकडे आहे,वकील रस्त्यात आहेतसुनावणी वेळी वकील आल्यानंतर खरेदीखत मोडी लिपीमध्ये आहेत्याचे अवलोकन व्हायला वेळ लागणार आहे,कौसाबाई सरोदे मालकीण कशा आहेत हे सिद्ध करा,गावातील 188 फेर गहाळ झालेले आहेत,हरवलेले आहेत,व आमच्याकडूनही खरेदीखत हरवलेली आहे त्याच्यामुळे त्या फेर नंबर मध्ये 





आमच्या खरेदी खताचा नंबर आहे,सर्व गोष्टींची शहानिशा करण्यासाठी आम्हाला सहा महिन्याचा वेळ द्यावा असे वकील यांनी सांगताच तालुका न्यायदाधिकाऱ्यांना नकार देताच अधिकाऱ्यावर आक्षेप घेत सदर केस तुमच्या न्यायालयात चालवायची नाहीआमचा या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आम्हाला पुन्हा ही केस दुसऱ्या तहसीलदारांकडे किंवा प्रांत साहेबांकडे वर्ग करायची आहे,असे उत्तरे दिले,मा. तहसीलदार साहेबांनी सदर केस निकालावर बंद करून ठेवली,

 






           सरपंच शरद पवार यांनी तहसील कार्यालय व महसूल प्रशासनाच्या बेजाबाबदार वागणुकीमुळे सर्वसामान्य शेतकरी,नागरिकांची हाल होत असल्याने व निकालाला विलंब होत असल्याने सत्याग्रह हल्लाबोल आंदोलन करण्यात आले






या प्रकरणाकडे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी तहसीलदारांना संपर्क करून सदर प्रकारांना चा निकाल द्या,असे आदेश देताच व आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत सातबारावर नाव व निकाल लागत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही अशी घोषणा होताच प्रशासनाचे धाबे दणाणले,







या आंदोलनाकडे सरपंच शरद पवार यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असल्याने त्याचा नायब तहसीलदार दळवी साहेब आंदोलन स्थळी येऊन निकालाची प्रत व बेकायदेशीर लागलेले नावे कमी करण्याचा फेर स्वतः आंदोलकांना व सरोदे परिवाराला देताच,निकाल लागताच मोठा जल्लोष पाहायला मिळाला,मागील नऊ दिवसापासून तहसील कार्यालय परिसरात सरोदे परिवार सरपंच शरद पवार अरुण पुढे पाटील यांच्या शेळी मेंढी आंदोलनाला सत्याग्रह हल्लाबोल आंदोलनाचे माध्यमातून यश मिळाले.





          या सर्व लढ्यात गावचे सरपंच शरद पवार यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला आणि सरोदे परिवाराला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. त्यामध्ये त्यांच्या साथीला युवानेते पांडुरंगजी दातीर,अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडेराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश पोटे,ऍड सतीश पालवेटिळक भोस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली,अहिल्यानगर तालुक्यातील नागरिक व सरोदे परिवार आहे यांनी सर्व सहकाऱ्यांचा सन्मान करून,लाडू भरून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.




         शेवटी सत्याचाच विजय झाला,नऊ दिवसापासून तहसील कार्यालयात शेळी मेंढी आंदोलनाला सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून यश आले,सत्यमेव जयतेभगवान के घर देर हे अंधेर नहीसत्य परेशान हो सकता है पराजित नहीराजकीय सत्ते पेक्षा सत्य निश्चित मोठे आहे,  न्यायासाठी लढणे,न्याय मिळवून देणे हे एक जबाबदार लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे,




म्हणून मी अन्याय विरुद्ध लढण्याचा विडा उचलला त्याला यश मिळाले त्याचा मला सार्थ अभिमान आहेव यापुढेही परत अशी घोडचूक तत्कालीन तलाठी/सर्कल व गावगुंडांनी करू नये यासाठी हायकोर्टात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सरपंच शरद पवार यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले.