Nagar Khisti Samaj Nivedan | ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची भाषा करणाऱ्या आमदार पडळकरांविरोधात ख्रिश्चन समाज आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी

Nagar Khisti Samaj Nivedan | पडळकरांविरुद्ध तात्काळ FIR नोंदवण्याची व कठोर कारवाईची मागणी



नगर : दर्शक ।  दि. 26 जून 2025 

सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात केलेल्या चिथावणीखोर व हिंसक वक्तव्यावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ख्रिश्चन समाजाच्या विविध संस्था, चर्च, धर्मगुरू आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदन सादर करून पडळकरांविरुद्ध तात्काळ FIR नोंदवण्याची व कठोर कारवाईची मागणी केली आहे.





निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून संविधान, कायदा आणि सामाजिक सलोख्यावर थेट आघात केला आहे. यामुळे राज्यातील ख्रिश्चन समाजात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagar Khisti Samaj Nivedan | पडळकरांविरुद्ध तात्काळ FIR नोंदवण्याची व कठोर कारवाईची मागणी






ख्रिश्चन प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, अहिल्यानगर येथील धर्मांतराच्या कथित प्रकरणात आत्महत्या झालेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे, मात्र या घटनेच्या निमित्ताने संपूर्ण ख्रिश्चन समाजाला आरोपी ठरवणे हा गंभीर अन्याय आहे. धर्मांतरविरोधी मोर्चात ख्रिश्चन धर्माचे पवित्र प्रतीक ‘क्रॉस’वर आक्षेपार्ह चिन्हे वापरण्यात आल्याची घटनाही निवेदनात नमूद करण्यात आली असून, संयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




ख्रिश्चन समाजाच्या वतीने निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना जिवे मारण्याचे जाहीर आवाहन करून समाजात धार्मिक तेढ निर्माण केली असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. भारतीय दंड संहिता व लागू असलेल्या कायद्यानुसार त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, 


Nagar Khisti Samaj Nivedan | पडळकरांविरुद्ध तात्काळ FIR नोंदवण्याची व कठोर कारवाईची मागणी





तसेच अशा व्यक्तीस सार्वजनिक जीवनात स्थान नसल्यामुळे त्यांच्या आमदारकीची तात्काळ रद्द करावी. त्यांनी संविधानाच्या मूल्यांचा अवमान करत धार्मिक द्वेषाचे विष पेरले आहे. त्यामुळे केवळ निवेदन देऊन चालणार नाही, तर प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कारवाई करावी, अशी ठाम मागणी ख्रिश्चन समाजाने केली आहे.



       हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ही प्रत पाठवून कार्यवाहीची विनंती करण्यात आली आहे.





        यावेळी रेव्ह जे आर वाघमारे, रेव्ह.. रूपेश निकाळजे, रेव्ह ..सतीश तोरणे, रेव्ह.. सनी मिसाळ,पास्टर विजय काकडे ,पास्टर जोसेफ वैरागर ,मा. प्रतीक बारसे, संजीव काकडे ,नलिनी गायकवाड, प्रा.. सॅम्युअल वाघमारे,संजय वाघमारे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.