Eye Camp Nagar | आरोग्य हेच खरे संपत्तीचं साधन’ - श्यामराव पिंपळे


Eye Camp Nagar | वडगाव गुप्ता येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार


     





Eye Camp Nagar |  नगर : दर्शक । 

 नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे स्वाभिमानी सोशल फाउंडेशन, श्री हनुमान सेवा भक्त मंडळ आणि वरद नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाला. या वेळी वरद नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रावसाहेब बोरुडे आणि डॉ. स्मिता पटारे यांचा विशेष सत्कार स्वाभिमानी सोशल फाउंडेशन आणि हनुमान सेवा भक्त मंडळातर्फे करण्यात आला.




      शिबिरात संगणकीकृत नेत्र तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू व काचबिंदूच्या रुग्णांना तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात आले. शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रेटिना, काचबिंदू, नेत्ररोपण, लेझर, इंजेक्शन इत्यादी शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.






     यावेळी बोलताना श्यामराव पिंपळे म्हणाले की, ग्रामीण भागात अजूनही आरोग्यविषयक मूलभूत सुविधा कमी प्रमाणात पोहोचत आहेत. अशा वेळी अशा प्रकारची मोफत तपासणी शिबिरे म्हणजे खर्‍या अर्थाने समाजसेवेचे उदाहरण आहे.




 डोळ्यांची तपासणी आणि आवश्यक शस्त्रक्रिया अल्प दरात किंवा मोफत करून देणे ही एक मोठी सामाजिक जबाबदारीची भावना आहे. ग्रामीण रुग्णांचे दु:ख समजून घेतले पाहिजे, आणि अशा योजनांतून त्यांना दिलासा मिळतो. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, ती जपण्यासाठी प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.




     या शिबिरात वडगाव गुप्ता तसेच पंचक्रोशीतील 254 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिरास  श्यामराव पिंपळे, बाबासाहेब डोंगरे, जालिंदर पाटील डोंगरे, गणेश आबासाहेब डोंगरे, गोरक शेवाळे, हौसराव ढोबळे, नाना शेवाळे, सुजित डोंगरे, 




भाऊ शेवाळे, नानासाहेब डोंगरे, सखाराम शिंदे, विठ्ठल डोंगरे, शेवाळे सर, उमेश डोंगरे, अंकुश नवले, भाऊ जरे, दिलीप सातपुते, संजय ढेपे, नामदेव शेवाळे, नंदू शेवाळे (पोलीस पाटील), पवार सर, किसन गीते, नामदेव गव्हाणे, विठ्ठल डोंगरे व अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टरांचे व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.