Yoga Guidance Nagar | रविवारी दि.29 रोजी यौगीक जीवन पध्दीतीवर तज्ञांचे मार्गदर्शन

Yoga Guidance Nagar | रविवारी दि.29 रोजी यौगीक जीवन पध्दीतीवर तज्ञांचे मार्गदर्शन


Yoga Guidance Nagar | नगर : दर्शक । 


दैनंदिन जीवनात योगाचा कशाप्ररे करून घेतला पाहिजे, योगाने प्रपंचातील प्रश्न कसे सुटतील, माझी योग साधना योग्य आहे काय? तसेच आधुनिक पिढीला योग मार्गावर  येण्यासाठी कसे प्रयत्न करावेत? यासंदर्भात " यौगीक जीवन पध्दती" या कार्यक्रमात 80 वर्षाचे अनुभवी व प्रथम पंतप्रधान योग पुरस्कार सन्मात डाॅ. विश्वासराव मंडलिक मार्गदर्शन करणार आहेत. 




हा कार्यक्रम रविवार दि. 29 रोजी सावेडी माऊली संकुल येथे सकाळी 9.30 वा. होणार आहे.



           योगाचा अभ्यास केल्यानंतर माणसाचे शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम रहाते. त्याचबरोबर आपले सामाजिक व कौटुंबिक स्वास्थही उत्तम घडते. परंतू एक तास योग केला म्हणजे योगाचे सर्व फायदे मिळतील असे नाही तर दिवसभर आपले वागणे - बोलणे योगानुकूल  पाहिजे. 



म्हणून "यौगीक जीवन पध्दीती" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डाॅ. सुचित तांबोळी, 




आयुर्वेद तज्ञ डाॅ. महेश मुळे, प्राचार्य डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे  व अॅड. निर्मला चौधरी सहभागी होणार आहेत.  तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन योग विद्या धाम या संस्थेने केले आहे.