Pipeline Road Nagar |  संत बहिणाबाई पायी दिंडीचे यशोदा नगरला स्वागत

Pipeline Road Nagar | विठ्ठल नामस्मरणाने जीवनात परिवर्तन - मोगल महाराज


   

   Pipeline Road Nagar |  नगर : दर्शक ।  


 शिरूर (ता. वैजापूर) येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीचे पाइपलाइन रोडवरील यशोदानगरात स्वागत करण्यात आले. या वेळी हभप मधुसूदन मोगल महाराज यांचे बाळासाहेब भुजबळ यांनी औक्षण करून सन्मानपूर्वक स्वागत केले. यावेळी जवाहर भुजबळ, ओंकार भुजबळ, माऊली गायकवाड, रघुनाथ औटी, अशोक औटी, बाबुराव दळवी, विणेकरी, झेंडेकरी, वारकरी उपस्थित होते.





       संत बहिणाबाई संस्थानची या दिंडीचे यशोदा नगरमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भगव्या पताका फडकवत दिंडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. परिसरात जय हरी विठ्ठल,पांडुरंगाच्या नावानं चांगभलं च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.





       यानंतर हभप मधुसूदन मोगल महाराज यांचे कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रभावी वाणीने उपस्थित वारकरी व भाविक मंत्रमुग्ध झाले. आपल्या कीर्तनात त्यांनी सांगितले विठ्ठल नामस्मरण हे जीवनात परिवर्तन घडवणारे आहे.      




आजच्या धावपळीच्या युगात मन:शांतीचा मार्ग हाच नामस्मरण आहे. संतांचा मार्ग हा कर्म,भक्ती आणि सेवा यांचा संगम आहे. आपले जीवन विठ्ठलमय झालं पाहिजे. संत बहिणाबाईंसारख्या भक्तांनी ज्या पायवाटेने पंढरी गाठली, ती पायवाट आज आपल्याला सत्य, प्रेम आणि समर्पण शिकवते.       


       


                 यावेळी बाळासाहेब भुजबळ यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले शिरूरच्या मातीतून निघालेल्या संत बहिणाबाई संस्थानच्या दिंडीचें यशोदा नगरमध्ये स्वागत होत असते ही आपल्या सर्वांची पावन पुण्याई आहे. अशा पवित्र संप्रदायांच्या स्वागतासाठी आमचा परिवार आणि परिसर नेहमीच तत्पर राहिला आहे. वारकर्‍यांच्या सेवेतून समाधान मिळते, आणि याच सेवेतून समाजाला एकतेचा, भक्तीचा आणि सकारात्मकतेचा संदेश दिला जातो. 





अशा दिंड्यांमुळे नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशोदा नगर मधील नागरिक, महिला मंडळ, तरुण कार्यकर्ते, व भुजबळ परिवाराने विशेष परिश्रम घेतले. या सर्वांना धन्यवाद दिले. दिंडीच्या पुढील टप्प्यासाठी दिंडीने भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान  झाले.