Satkar | शिक्षक भारतीच्या वतीने उपसंचालक गणपत मोरे यांचा सन्मान

Satkar | शिक्षक भारतीच्या वतीने उपसंचालक गणपत मोरे यांचा सन्मान




 Satkar | नगर : दर्शक । 

   पुणे विभागीय उपसंचालक कार्यालय येथे अनेक दिवसांपासून पूर्णवेळ उपसंचालक नसल्याने नगर, पुणे, सोलापूर येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्‍न प्रलंबित होते परंतु बदली होऊन नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी पदभार स्वीकारला.



 यावेळी पुणे विभाग शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर व इतर पदाधिकारी यांनी गणपत मोरे यांचा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने स्वागत व सन्मान केला. यावेळी अनेक कर्मचार्‍यांचे प्रश्‍न प्रलंबित आहे यावर सहविचार सभा आयोजित करून प्रश्‍न सोडवण्याची विनंती कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी केली.




      यावेळी उपसंचालक मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच सहविचार सभा आयोजित करून प्रश्‍न सोडवले जातील असे आश्‍वासन मोरे यांनी दिले. गणपत मोरे हे लातूर विभाग उपसंचालक पदावर कार्यरत होते. 




त्यांची बदली होऊन पुणे उपसंचालक पदावर ते नुकतेच रुजू झाले त्यांचे काम अतिशय चांगले आहे.  अशी शिक्षक व कार्यालयीन कर्मचार्‍यांमध्ये चर्चा होती त्यामुळे पुणे विभाग उपसंचालक कार्यालय येथे आनंदी वातावरण दिसले. त्यामुळे लवकरच  शिक्षकांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा, अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये दिसत होती.  यावेळी शिंदे बी.आर.,रोहिणी डावरे, दत्तात्रय आवारी उपस्थित होते.





     शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे,विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे ,तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, 





साई थोरात,संजय भालेराव,नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार,कल्पना चौधरी, अकील फकीर,बाबाजी लाळगे, दीपक फापाळे,वैभव चोथे,संपत वाळके,गणपत धुमाळ,विजय पांडे,प्रवीण मालुंजकर,अमोल तळेकर,संतोष नवले,श्याम जगताप आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.