‘गरुडझेप’ कार्यक्रमाने इतिहासप्रेमींना दिली स्वराज्य प्रेरणेची नवचेतना!

‘गरुडझेप’ कार्यक्रमाने इतिहासप्रेमींना दिली स्वराज्य प्रेरणेची नवचेतना!





     

नगर : दर्शक । 


 छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून राजगडाकडे केलेल्या अद्वितीय आणि धाडसी प्रवासाच्या प्रेरणेतून साकारलेला ‘गरुडझेप - आग्र्याहून राजगड’ हा भव्य ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच नगर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.




     नगरचे जिगर आणि श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती - राजधानी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार संग्राम जगताप आणि जलसंवर्धन कार्यकर्तेपोपटराव पवार उपस्थित होते. दोघांनीही आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आजच्या समाजातील उपयुक्तता अधोरेखित करत राष्ट्रप्रेम, स्वराज्य आणि लोकसहभागाचे मूल्य उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडले.



     कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून ‘मराठा पातशहा’ या पुस्तकाचे लेखक, इतिहास अभ्यासक व पुरातत्त्वतज्ज्ञ केतन पुरी यांनी आपल्या सखोल अभ्यासातून छत्रपतींच्या आग्र्यातून राजगडापर्यंतच्या थरारक प्रवासाचे इतिहासदृष्ट्या विश्‍लेषण सादर केले. त्यांच्या ओघवत्या भाषणाने उपस्थितांना इतिहासाशी नव्याने जोडले.




     कार्यक्रमाचे निवेदन संतोष घुगे ले सर यांनी केले. त्यांच्या प्रभावी निवेदनशैलीमुळे संपूर्ण कार्यक्रमात एकसंधता व ऊर्जा निर्माण झाली.




     या कार्यक्रमासाठी प्रायोजक व सहकार्य अ‍ॅड. रवींद्र शितोळे अँड असोसिएट्स, जिजाऊ ब्रिगेड, सोयरा मराठा वधू-वर सूचक केंद्र - अहिल्यानगर, आमचं एमन रायगडाच्या मातीशी, स्वस्तिक मंडप, Fit Nation Gym, BBG Sound (अवधूत गुरव) यांनी कार्यक्रमाला बहुमूल्य सहकार्य दिले.



     कार्यक्रम यशस्वीतेसाठी रणवीर शितोळे, प्रथमेश गोसावी, वेदांत जोशी, गणेश मोकाटे, निरज राजपूरे, तुषार साळुंखे, अप्पा भाणे, सतीश फंड, ओंकार पाटील, सिद्धेश धिंदळे, कार्तिकी भालेराव, रवी दांगट, शिवाजी राजपूरे, विवेक मोरे, रवी मोरे, सिद्धार्थ बचाटे, किशोर भालशंकर, शिवानी दाणी, पियुष गांगर्डे, किरण बुगे, राजेश घोलप, परशुराम दरेकर, सुमित मरकड - या सर्व कार्यकर्त्यांनी संघभावनेने, समर्पणाने आणि संयोजनशक्तीने कार्यक्रम यशस्वी केला.




     कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रवीण गोंधाडे यांनी केले. त्यांनी सर्व पाहुण्यांचे, संस्थांचे, सहकार्य करणार्‍या घटकांचे आणि विशेषतः नगरकर जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. जनतेच्या भरघोस प्रतिसादामुळे हा कार्यक्रम इतिहासाची जाणीव निर्माण करणारा आणि स्वराज्यभावना जागवणारा ठरला, असे ते म्हणाले.




     ‘गरुडझेप’ हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर स्वराज्याच्या मूल्यांची नवचेतना देणारा, इतिहासाच्या प्रेरणांचा जागर करणारा एक सशक्त लोकप्रबोधन सोहळा ठरला.