Mukundnagar Satkar | मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
नगर : दर्शक
आजचा दिवस हा केवळ यशाचा उत्सव नाही, तर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीला मिळालेल्या सन्मानाचा दिवस आहे. तुम्ही केवळ गुण मिळवलेले नाहीत, तर समाजासमोर एक आदर्श ठेवलाय की कष्ट, संयम आणि सातत्य या गोष्टींचा मिलाफ असला की कोणतीही परीक्षा कठीण राहत नाही. तुमचं हे यश तुमच्या आई-वडिलांचं, शिक्षकांचं आणि सर्वच मार्गदर्शकांचंही यश आहे. त्यांचा हात आणि आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहे.
शिक्षण केवळ पदवी मिळवण्यासाठी नाही, तर समाज घडवण्यासाठी असते. असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी खानसाहब शेख सर यांनी केले.
मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने दहावी बारावी सीए वकील डॉक्टर व इतर व्यवसायीक कोर्सेस मध्ये प्रथम दर्जामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा एन.एम. गार्डन मुकुंदनगर येथे पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयटीआयचे प्रचार्य खालीद जहागीरदार, माजी प्रचार्य नवेद बिजापुरे,नोटरी पब्लिक एडवोकेट हाफीज जहागीरदार, नगरसेवक आसिफ सुलतान, निजाम जहागीरदार मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद खान, माजी नगरसेविका नसीम खान,
अल करम हॉस्पिटलचे डॉ. जहीर मुजावर, डॉ सईद शेख, आर्किटेक्ट अर्शद शेख,डॉ.परवेज अशरफी,जाहिद सय्यद,पत्रकार जहीर सय्यद,मुख्याध्यापक मुन्नवर हुसेन, अफजल पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक संविधान वाचनाने करण्यात आली.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा शाल पुष्प व समृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. व अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. तर काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी खान साहब शेख सर हे होते.
पुढे बोलताना शेख सर म्हणाले की तुम्ही आज ज्या यशाचं गमक उचललं आहे, त्याचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी केला, तर तुम्हाला खरा आनंद मिळेल.
प्रत्येक यशस्वी विद्यार्थी हा भविष्यातील डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, शिक्षक अशा विविध भूमिका पार पाडणार असतो. पण त्याहीपेक्षा तो एक चांगला नागरिक, संवेदनशील माणूस म्हणून घडला पाहिजे. हीच खरी तुमच्या पासुन अपेक्षा आहे.उद्याचे भारत हे तुमच्या खांद्यावर उभे राहील. आणि त्याला उज्वल करण्याची ताकद तुमच्यात आहे असे नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी खानसाहब, उपाध्यक्ष हाजी रऊफ मोहम्मद शेख बिल्डर, कार्याध्यक्ष अल्हाज आलम खान, सचिव बशीर पठाण, सहसचिव शेख फकीर मोहम्मद, खजिनदार इस्माईल पठाण,
सदस्य हाजी शेख बिलाल, कादिर सर, शेख अब्दुल रहीम गोटू जहागीरदार, इब्राहिम पठाण, मिर्झा नवेद अंजुम, शेख हबीब पेंटर, सय्यद इकबाल, एड. सय्यद मो.अन्वर, हाजी सय्यद अब्दुल अजीज,
शेख गुलाम दस्तगीर, शेख इस्माईल, हाजी शेख अब्दुल सईद, सय्यद आरिफ, हाजी शेख शरफुद्दीन, पठाण हबीब, सय्यद नुर मोहम्मद, एड.ताज आश्रफ आदींनी भरपूर परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच समाजात सामाजिक काम करणारे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईस्माईल शेख व हाजी शरफुद्दीन सर यांनी केले. तर आभार रऊफ बिल्डर यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com