नगर बारा बलुतेदार महासंघातर्फे सत्कार
नगर - “सरकारी कामकाज करताना कायद्याच्या चौकटीत राहून जनतेची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे.पोलिस अधिकारी म्हणून समाजात कायदा-सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारी रोखणे व नव्या पिढीला सुरक्षित व व्यसनमुक्त वातावरण देणे हे आमचं सर्वोच्च ध्येय आहे,” असे प्रतिपादन नगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) संतोष खाडे यांनी केले.
श्री.संतोष खाडे यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत अहिल्यानगर बारा बलुतेदार महासंघ तर्फे त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते खाडे यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी राधाकृष्ण घुले, किरण राऊत, अमित गोरे, आदिनाथ गायकवाड, आरिफ शेख, संदीप घुले, ऋषी औटी,विजय पानमळकर पार्श्वनाथ औटी,बापू गायकवाड, श्री.पालवे साहेब,श्री.मोरे साहेब तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.खाडे यांनी सांगितले “अवैध सुगंधी तंबाखू, मावा, गांजा, गुटखा यामुळे तरुणाईचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच आम्ही अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सर्वसामान्य जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. लोकांचा विश्वास हीच आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे.”
यावेळी बोलताना माऊली गायकवाड यांनी खाडे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करून म्हणाले की, “संतोष खाडे हे एक प्रामाणिक, संयमी व दूरदृष्टी असलेले अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळात शहरातील गुन्हेगारीला चाप लागला आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना त्यांनी मानवी दृष्टिकोन जपला आहे. समाजातील तळागाळातला माणूस त्यांच्यापर्यंत सहज पोहोचतो, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com