Crime News | अॅट्रासिटी व खुनाचा प्रयत्न : दोघांचा अर्ज नामंजूर 

Crime News | अॅट्रासिटी व खुनाचा प्रयत्न : दोघांचा अर्ज नामंजूर



नगर : दर्शक । 

दि. २४/०६/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता जखमी सुनिल रामलाल परदेशी हे त्यांचे हॉटेल मातोश्री, तिसगांव, ता. पाथर्डी येथे अस्तांना आरोपी गणेश संजय म्हस्के व सोमनाथ मच्छिंद्र लवांडे हे इतर आरोपींसमवेत आले व जेवणाच्या बिलावरुन भांडण झाले. त्या भांडणात आम्ही तुमचा काटा काढून तुम्हांला जिवे ठार मारतो असे म्हणून ते तेथून निघुन गेले



 संध्याकाळी ६.०० वाजता इतर तीन आरोपींबरोबर आले व या दोघांचे बरोबरचे आरोपींनी सुनिल परदेशी यांचे बरगडीवर चाकूने मारहाण करून खुन करण्याचा प्रयत्न केला या प्रकाराबद्दल पाथर्डी पोलिस स्टेशन येथे वरील दोन आरोपी व इतर आरोपींविरुध्द 



भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११५(२) इत्यादी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला वरील दोन आरोपींनी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला तो नामंजूर करण्यात आला.  



जखमी सुनिल परदेशी हे तिसगांव गटाचे पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांचे तर्फे अॅड. सतिशचंद्र सुद्रिक यांनी मुळ फिर्यादीतर्फे काम पाहिले.