जैन कॉन्फरन्सच्या आत्मध्यान योजनेचे राष्ट्रीय मंत्री अशोक बलदोटा यांचा शपथविधी 


जैन कॉन्फरन्सच्या आत्मध्यान योजनेचे राष्ट्रीय मंत्री अशोक बलदोटा यांचा शपथविधी





नगर : दर्शक । 

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स अंतर्गत राष्ट्रीय आत्मध्यान योजनेच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नगरच्या अशोक बलदोटा यांची निवड झाली आहे. श्रमण संघीय आचार्य भगवंत पूज्य डॉ.शिवमुनीजी म.सा., युवाचार्य पूज्य महेंद्र ऋषीजी म.सा. यांच्या उपस्थितीत सुरत येथे हा कार्यक्रम झाला.





 राष्ट्रीय अध्यक्ष शशीकुमारजी (पिंटूभाऊ) कर्नावट यांच्या नेतृत्वाखाली बलदोटा यांची निवड झाली. त्यांचा शपथविधी समारंभ आचार्य पूज्य डॉ. शिवमुनीजी म.सा.व साधूसंत तसेच जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सौ. रत्नप्रभा अशोक बलदोटा यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.






नवीन कार्यकारिणीचे दर्शना लुणावत, चंद्रकांत चोरडिया , पारस मुथा घोडनदी,छत्रपती संभाजी नगर येथील १० ते १५ जैन कॉन्फरन्सचे कार्यकर्ते, निखिल संचेती, सिद्धार्थ शेटिया, संदेश कर्नावट, रंगेश बाफना, नयन ओस्तवाल, तेजस संचेती, तेजस संजय कोठारी जामखेड, राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा, नगर येथील जैन कॉन्फरन्सचे कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांनी दिली.





यावेळी बोलताना अशोक बलदोटा म्हणाले जैन कॉन्फरन्स ही समाजाची शिखर संस्था आहे आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पडली आहे आता मी जोमाने काम करून संस्था वाढवण्याचे काम करेल नगर येथील जैन कॉन्फरन्सचे संघटन मंत्री पोपट लोढा यांनी अभिनंदन केले