रविवारी ॱएक दिल दो आवाजॱ गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
नगर : दर्शक ।
येथील संगीत मेजवानी मध्ये नावाजलेल्या एस के मेलडी सिंगर्स ग्रुपच्या वतीने भारतीय सिनेमातील दिग्गज गायक मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या गीतांची मैफल ॱएक दिल दो आवाजॱ चे आयोजन रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी सावेडी येथील माऊली सभागृहात संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजक समीर खान व किरण उजागरे यांनी दिली.
या कार्यक्रमात किरण उजागरे, पवन फिरोदिया, समीर खान,सारंग पंधाडे, इस्थर पवार, मोहसीन सैफी, नेहा ओस्तवाल,समी खान,पुनम कदम हे कलाकार गीते सादर करतील.
सूत्रसंचालन रियाज पठाण हे करतील. कार्यक्रम लाईव्ह म्युझिक बरोबर असल्यामुळे संगीत संयोजन निलेश सोजवल व ऍडवीन पेरेपाडम, साऊंड लाईट्स हर्मन प्रो ऑडीओ अँड लाईट्स श्रीरामपूर हे करतील.असे किरण उजागरे यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व इनकोर इंडस्ट्रीज,काशीद हॉस्पिटल,युनायटेड सिटी हॉस्पिटल, कुबेर मार्केट, मिवारा ब्रेकिंग न्यू ग्राऊंड्स, एच एस आर पी फिटमेंट सेंटर आदींचे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिकेसाठी 7020681422 या नंबरवर संपर्क साधावे.कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रधाण्य असणार असल्याचे समीर खान यांनी सांगितले.
तरी या एक आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद सर्व संगीत रसिकांनी अवश्य घ्यावा. असे आवाहन आयोजक समीर खान व किरण उजागरे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com