निष्पाप बळी घेणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याचा समाजवादी पार्टी तर्फे जाहीर निषेध करुन मयतचे कुटुंबियांना शासनाने 25 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी
नगर : दर्शक ।
नगर शहरातील वाहतूक समस्या आज पर्यंत सुटलीच नाही, पूर्वी उड्डाणपूल व बाह्य वळण रस्ता नसल्या मुळे दररोज अपघात होतं होते. त्यात कित्येक बळी गेले, परंतु अता शहरात उडाणपूल तसेच बाह्य वळण रस्ता असून ही बिनधास्त पणे जड वाहतूक सुरु आहेत, व निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत.
आठ दिवसा पूर्वीच तारकपूर येथे एका महिलेचा दुर्दैवी अंत झाले. परंतु निर्लज्ज, बेशरम, बेजबाबदार अधिकाऱ्यांनी याची कोणतीच दखल घेतली नाही. व आज दिल्लीगेट येथे पुन्हा प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे एक निष्पाप तरुणाचे दुर्दैवी अंत झाले.
याला अहमदनगर पोलीस अधीक्षक, ट्रॅफिक पोलीस व महापालिकेचे अधिकारीच जबाबदार असून त्या सर्वांचे समाजवादी पार्टी अहमदनगर तीव्र धिक्कार व निषेध करीत आहेत. व बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना रुपये 25 लाख नुकसान भरपाई म्हणून द्यावी.
अजून कोणाच्या बळीची वाट ना पाहता त्वरित शहरातून जड वाहतूकीला बंदी घालावी. अन्यथा नगरकरांच्या सुरक्षतेसाठी समाजवादी पार्टी मोठा जन आंदोलन उभारेल याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी.असे निवेदन शहरजिल्हा अध्यक्ष समाजवादी पार्टीचे आबिद हुसैन यांनी जिल्हाधिकारी अ.नगर यांना दिले आहे.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com