चिचोंडीपाटीलमध्ये विद्यार्थी सार्थक कुलथे १ दिवसाचा सरपंच

नगर : दर्शक ।          नगर-चिचोंडी  पाटील येथील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच शरदभाऊ  पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली"ऑगस्ट क्रांती पंधरवडा" मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.



 



नगर : दर्शक । 

       नगर-चिचोंडी  पाटील येथील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच शरदभाऊ  पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली"ऑगस्ट क्रांती पंधरवडा" मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.





यामध्ये ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कृषी,आरोग्य,महसूल,महिला बालकल्याण,शिक्षण,ग्रामस्वच्छता यासह अनेक विभागांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना बोलवून गावात थेट योजना राबविण्यात येत आहे त्यामध्ये आज ग्रामस्वराज्य अभियान मध्ये  विद्यार्थी दिन,विद्यार्थी,शिक्षक पालक दिनआयोजित करण्यात आला आहे,




यामध्ये ग्रामपंचायत चिचोंडी पाटीलचे सरपंच पदाचे प्रतिनिधित्व न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील येथे एक दिवसाचा सरपंच या निवडणुकीत निवडून आलेले युवा विद्यार्थी सरपंच कु.सार्थक रमेश कुलथे यांच्या हातात उद्या गावचे सूत्र असणार व त्यांच्या मार्गदर्शनाखालीस्वच्छता,आरोग्य,ग्रामविकास,शिक्षण ,बांधकाम,महसूल,महिला बालविकासया संविधान विषयावर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहेत.





         ते सर्व पदाधिकारी विद्यार्थी ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या विविध प्रश्नावर मार्गदर्शन करणार आहेत.विद्यार्थी सरपंच यांच्याबरोबर संपूर्ण दिवसभर सर्व पदाधिकारी,कर्मचारी व दिवस पद रिक्त असलेले सरपंच सर्व ठिकाणी असणार आहेत